Goa| Covid Vaccination Dainik Gomantak
गोवा

Covid Vaccination: गोव्यात कोविड लसीकरण मोहीम आजपासून सुरू

सरकारी रुग्णालयांमध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत कोविशिल्ड लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करणार आहे.

दैनिक गोमन्तक

Covid Vaccination: राज्य सरकार बुधवार, 18 रोजीपासून आरोग्य सेवा संचालनालयाच्या अंतर्गत निवडक सरकारी रुग्णालयांमध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत कोविशिल्ड लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करणार आहे. ही लस फक्त निवडक सामुदायिक, प्राथमिक व शहरी आरोग्य केंद्रांसह गोमेकॉत उपलब्ध असेल.

राज्यात अजून काहीजणांनी ही लस घेतलेली नाही व महामारीही संपलेली नसल्याने सावधगिरी बाळगण्यासाठी ती मोफत उपलब्ध केली आहे, अशी माहिती लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम देसाई यांनी दिली.

केंद्राकडून गोव्यासाठी सुमारे 1 हजार डोस आज पाठवल्याने लसीकरणास उद्यापासूनच सुरुवात करण्याचे ठरवले आहे. हे डोस संपल्यानंतर आणखी मागणी केली जाईल. कोविड लसीच्या एका बाटलीत 10 डोस असतात.

त्यामुळे दरदिवशी हे लसीकरण ठेवल्यास किमान पाचपेक्षा अधिकजण लसीकरणास आल्याशिवाय ही बाटली वापरल्यास त्यातील उर्वरित डोस वाया जाऊ शकतात.

त्यामुळे दोन दिवस निश्‍चित केल्याने लाभधारक त्यादिवशीच येतील, असे मत डॉ. देसाई यांनी व्यक्त केले. ही मोहीम आठवड्यातून दोन दिवस दर बुधवारी सकाळी 9 ते 4 या वेळेत, दर शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT