Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

कोविड बळींच्‍या कुटुंबांना भरपाई देणार; मायकल लोबो

भाजप सरकारच्‍या बेजबाबदारपणामुळेच अनेक रुग्‍णांचा मृत्‍यू; मायकल लोबो

दैनिक गोमन्तक

शिवोली : भाजपच्या कार्यकाळात सामान्य माणसाची अवहेलना करण्यात आली. त्यांच्या कुटुंबाची तसेच व्यवसायाची सरकारला अजिबात पर्वा नव्हती. गोवा माईल्स तसेच अन्य कंपन्या छुप्या रितीने राज्यात आणून स्थानिक टॅक्सीवाल्यांचे कंबरडे मोडून टाकण्‍यात आले. कोविड काळात तर सरकारने बेजबाबदार पणाचा कळस गाठला आणि अनेकांच्या मृत्‍यूस कारणीभूत ठरले.

कोविडमुळे बळी गेलेल्यांना नुकसान भरपाई देण्यातही भाजप (BJP) सरकार अपयशी ठरले. गोव्यात काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन होताच महिनाभरात कोविड बळींच्‍या कुटंबांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही कळंगुटचे माजी आमदार तथा काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी हणजूण येथे बोलताना दिली.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते कदम, शिवोली काँग्रेस गटाध्यक्ष पार्वती नागवेकर, शिवोलीच्‍या उमेदवार दिलायला लोबो, माजी आमदार तथा मंत्री चंद्रकांत चोडणकर, मार्ना-शिवोलीच्या सरपंच शर्मिला वेर्णेकर, सडयेचे माजी सरपंच नीलेश वायंगणकर, आसगावचे सरपंच हनुमंत नाईक, ओशेल सरपंच वंदना नार्वेकर, काणका-वेर्ला सरपंच अमिता कोरगावकर, माजी जिल्‍हा पंचायत सदस्‍य वासुदेव कोरगावकर, शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष विद्याधर आगरवाडेकर, हणजूण- कायसुवचे पंचायत मंडळातील सदस्य उपस्थित होते.

पक्षाच्या उमेदवार दिलायला लोबो यांनी आपण बाहेरची नसून शेजारची असल्याचे सांगितले आणि आपल्या परंपरेनुसार ऐनवेळी शेजारीच शेजाऱ्याच्‍या उपयोगी पडत असल्याचे सांगितले. आपल्या शेजारच्या शिवोलीची झालेली अधोगती पाहून आणि महिलांची पाण्यासाठी होणारी फरफट पाहून आपले मन दु:खी व्‍हायचे. स्थानिकांनी दिलेल्या हाकेला मान देत आपण शिवोलीतून लढत आहे. निवडून आल्यास शिवोलीचा कायापालट करण्याचे आपण वचन देते.

चंद्रकांत चोडणकर यांनी सांगितले की, दिलायला लोबो या कार्यक्षम व्यक्ती असून त्यामुळेच पर्रा पंचायतीवर सरपंच म्हणून त्यांची सतत तीनवेळा निवडून आल्‍या. त्यांच्यासारख्या सुशिक्षित तसेच कार्यक्षम व्यक्तीच शिवोलीचे सध्याचे ओंगळवाणे स्‍वरूप बदलू शकतात असे सांगितले. दरम्‍यान, कदम यांनीही सभेला मार्गदर्शन केले. पार्वती नागवेकर यांनी स्वागत केले तर युवा नेते गजानन तिळवे यांनी प्रास्ताविक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT