Health Minister Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

राज्यात कोविड रुग्ण वाढत आहेत; मात्र सध्यातरी कोणतेही निर्बंध नाहीत

बालचिकित्सकांच्या क्लिनिकमध्येही कोविड लसीकरणास मान्यता देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात कोविड रुग्ण वाढत आहेत मात्र सध्यातरी कोणतेही निर्बंध असणार नाहीत. आशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. मात्र नागरिकांनी स्वत:हून मार्गदर्शक तत्वे पाळावी असे आवाहन त्यांनी केले. बालचिकित्सकांच्या क्लिनिकमध्येही कोविड लसीकरणास मान्यता देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.

(covid patients are on the rise in the state; But at present there are no restrictions)

कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता गृहित धरून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने रविवारी राज्यभर टिका उत्सव आयोजित केला होता. मात्र, या उत्सवाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अद्यापही 1 लाख 76 हजार नागरिकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतलेला नाही. केवळ 2 हजार 721नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनीही पणजीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाऊन बूस्टर डोस घेतला.

याशिवाय प्रामुख्याने साठ वर्षावरील जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर यापूर्वीच्या विविध आजाराने आजारी असलेले नागरिक यांना बूस्टर डोस घेणे अत्यावश्यक आहे. मात्र, नागरिक टाळाटाळ करत आहे. ही बाब जीवघेणी असू शकते. त्यामुळे डोस घ्यावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 262

राज्यात आज कोरोनाचे नवे 62 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर वाढून 7.05 टक्के इतका झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा शंभराच्यावर जावून 328 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 115 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 955 रुग्ण बरे झाले. काल दिवसभर 915 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT