रावणफोंड येथे घातक कचऱ्याला आग

आरोग्याला धोका : धुराच्या लोटांमुळे अपघातांनाही निमंत्रण
Fire in Madgaon
Fire in MadgaonDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा : आके येथून पॉवर हाऊसकडे जाणाऱ्या बगल रस्त्याशेजारी दुपारी आणि सायंकाळी कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे रावणफोंड पुलावर सतत धुराचे लोट उठत असल्याने लोकांना खासकरून वाहन चालकांना त्रास होत आहे. कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

येथील कचऱ्याला आग सकाळच्या सत्रात 11 वाजण्याच्या सुमाराला लावण्यात येते. त्यामुळे धुराचे लोट उठतात. हा धूर वाऱ्यामुळे सर्वत्र पसरतो. त्यामुळे येथील पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना धुरातून वाट काढत पुढे जावे लागते.

कधी कधी धुराचे लोट इतके प्रचंड असतात, की दुसऱ्या बाजूने येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. अशाने अपघात होण्याची शक्यता आहे.

Fire in Madgaon
महिलेच्या ‘त्या’ पत्राची गोवा खंडपीठाकडून दखल

या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळीही कचऱ्याला आग लावण्यात येते. येथे थर्माकोल, प्लास्टिकच्या पिशव्या आणि आरोग्याला अपायकारक असलेला कचरा जाळला जातो. मडगाव नगरपालिकेने या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन येथे कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com