Corona|Covid-19| JN.1 Dainik Gomantak
गोवा

COVID-19 Sub-Variant JN.1: गोव्यात सर्वाधिक रुग्ण? केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीवर गोवा सरकारचं उत्तर

देशात कोरोनाच्या जेएन-१ या नव्या व्हेरिएंटचे एकूण ६३ रुग्ण आहेत

Ganeshprasad Gogate

COVID-19 Sub-Variant JN.1 Goa Cases

कोरोनाच्या जेएन-१ या नव्या प्रकाराच्या रुग्णसंख्येत गोवा देशात अग्रस्थानी असल्याची आकडेवारी समोर आल्याने चिंतेत भर पडली होती. मात्र, या आकडेवारीवरून गोव्याच्या आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. गोव्यातून कोविडचा उपप्रकार जेएन१ रुग्णांची संख्या १९ इतकी पाठवण्यात आली होती. मात्र केंद्रस्तरावर हा आकडा दोनदा मोजला गेला असून गोव्यातील रुग्णसंख्येबाबत गोंधळ झाला, अशी माहिती गोमेकॉचे डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सोमवारी दुपारी एएनआय या वृत्तसंस्थेने X या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर पोस्ट शेअर केली. यात सूत्रांच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला होता की, देशात कोरोनाच्या जेएन-१ या नव्या व्हेरिएंटचे एकूण ६३ रुग्ण आहेत. यात गोव्यात सर्वाधिक म्हणजेच ३४, तर महाराष्ट्रात ९, कर्नाटकात ८, केरळात ६, तामिळनाडूत ४ आणि तेलंगणात २ रुग्णांचा समावेश आहे. ही आकडेवारी रविवारची असल्याचा उल्लेखही होता.

नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरातील पर्यटक गोव्यात येतात. अशा परिस्थितीत गोव्यात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्णांच्या दाव्याने चिंतेत भर पडली. यासंदर्भात गोव्यातील आरोग्य विभागाने दुपारी स्पष्टीकरण दिले आहे. गोव्यातून कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या रुग्णांची संख्या १९ इतकी पाठवण्यात आली होती. मात्र केंद्रस्तरावर हा आकडा दोनदा मोजला गेला असून गोव्यातील रुग्णसंख्येबाबत गोंधळ झाला, असे गोमेकॉचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT