South Goa District hospital (Covid-19) Dainik Gomantak
गोवा

Covid-19: ‘कोविड’च्‍या तिसऱ्या लाटेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सज्ज

इस्पितळ अत्याधुनिक उपचार यंत्रणांनी सज्ज (Well equipped hospital) (covid-19)

Bhushan Aroskar

मडगाव: कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (Covid third wave)परिणाम लहान मुलांवर होण्याची शक्यता गृहीत धरून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ (District hospital south Goa) सज्ज ठेवले आहे. या इस्पितळात लहान मुलांवर उपचार करण्यासाठी ६१ खाटांचा खास विभाग उघडण्यात आला आहे (Child care ward). मागच्या महिन्यात दक्षिण गोव्यात २ लहान मुलांना कोविडची (मिस्क सिंड्रोम) लागण झाली होती. त्या मुलांना उपचारासाठी गोमेकॉत पाठविण्यात आले होते. ही दोन्ही मुले सध्या बरी झाल्याची माहिती कोविड कृती दलाच्या सदस्य डॉ. आयरा आल्मेदा यांनी दिली. भविष्यात दक्षिण गोव्यात अशी प्रकरणे वाढल्यास ती हाताळण्यासाठी दक्षिण गोवा इस्पितळ अत्याधुनिक उपचार यंत्रणांनी सज्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Covid-19)

इस्पितळ अत्याधुनिक यंत्रणानी सुसज्ज

सध्या या इस्पितळात सुसज्ज अशा बाल उपचार विभागाबरोबरच (Child care ward) ७ खाटांचा हायडिपेडन्सी विभाग, तसेच १२ खाटांचा नवजात बालकांवर (Neonate) उपचार करण्यासाठी विभाग सुरू केला आहे. त्याशिवाय लहान मुलांना उष्णता देणारे व्होर्मर, सिरिंग पंप्‍स, मल्‍टिपॅरा मॉनिटर्स, फोटोथेरपी मशीन, लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर (Ventilator) अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तिसऱ्या लाटेत ८ वर्षांखालील मुलांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, त्यांच्यावर कसे उपचार करावेत यासाठी परिचरिकांनाही (Nurse) प्रशिक्षण दिल्‍याची माहिती डॉ. आल्मेदा यांनी दिली.

मुबलक प्रमाणात ऑक्सिजनची व्यवस्था

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाची एकूण क्षमता ५६१ खाटांची व्‍यवस्‍था असून या इस्पितळात मुबलक ऑक्सिजन (Oxygen) पुरवठ्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या इस्पितळात ५६०० लिटर्स ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता असलेली टाकी कार्यरत आहे. दर मिनिटाला ६०० लिटर्स ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता असलेला प्रकल्प सुरू केला आहे. त्याशिवाय दर मिनिटाला ९६० लिटर्स ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता असलेला नवीन प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याने या इस्पितळात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. या ऑक्सिजनच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी डॉ. गायत्री कल्याणशेट्टी यांची नेमणूक केल्याची माहिती इस्पितळ सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT