Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: बलात्कारप्रकरणी संशयिताचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; पीडितेला आमिष दाखवण्याची शक्यता

पणजी पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात संशयिताविरुद्ध भादंसं कलम 376 व पोक्सो कायद्याखाली आरोप ठेवले आहेत.

Manish Jadhav

बलात्कारप्रकरणातील संशयिताविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी आरोप निश्‍चितीचा आदेश तसेच अल्पवयीन पीडित व साक्षीदारांची जबानी नोंद झालेली नाही. त्यामुळे संशयित पीडितेला किंवा साक्षिदारांना आमिष दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने (पोक्सो) संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला.

पणजी पोलिसांनी न्यायालयात (Court) दाखल केलेल्या आरोपपत्रात संशयिताविरुद्ध भादंसं कलम 376 व पोक्सो कायद्याखाली आरोप ठेवले आहेत. या प्रकरणातील खटला न्यायालयात प्रलंबित आहे. संशयिताविरुद्ध खोटे आरोप करुन पीडितेने तक्रार केली आहे.

पीडितने पोलिस व प्रथमश्रेणी न्यायालयासमोर दिलेल्या जबानीत विसंगती आहे. बलात्कारसंदर्भात वैद्यकीय चाचणी अहवाल नकारात्मक आला त्यामुळे हा आरोप सिद्ध होत नाही. तो फरारी होण्याची शक्यता नाही. त्याला अटी घालून जामीन द्यावा, अशी बाजू त्याच्या वकिलांनी मांडली.

संशयिताने पीडितेशी मैत्री करुन तिला गाडीतून निर्जनस्थळी नेऊन चारवेळा लैंगिक अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली होती. यासंदर्भात कोणाला माहिती दिल्यास तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार पीडितेने पोलिसात (Police) दिली आहे. त्यामुळे संशयिताविरुद्ध ठोस पुरावे आहेत व या खटल्यावरील सुनावणी अजून सुरू व्हायची आहे. तो पीडित किंवा साक्षीदारांना आमिष किंवा धमकावण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Konkani Academy: गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

"मी चर्चमध्ये जाणं सोडलं; माझा हरवलेला सन्मान कोण परत देणार?" निर्दोष सुटल्यानंतर माविन नेमकं काय म्हणाले?

Margaon: खुल्या जागेत मासेविक्री नको, आरोग्य केंद्राकडून पालिकेला निर्देश; मोकळ्या जागेचा होतोय गैरवापर

दिव्‍यांग व्‍यक्ती, विद्यार्थ्यांचे हात साकारणार देवतांच्‍या मूर्ती; मिळणार 3 हजार रुपयांचे आर्थिक साहाय्‍य, मंत्री फळदेसाईंची माहिती

Pernem: पेडणे सामुदायिक आरोग्य केंद्रात 59 पदे रिक्त; कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांचे हाल: म्हापसा जिल्हा रुग्णालय, 'गोमेकॉ'वर भिस्त

SCROLL FOR NEXT