Electricity scam case hearing Dainik Gomantak
गोवा

Power Scam Hearing : गुदिन्हो यांना सुनावणीस गैरहजर राहण्यास न्यायालयाची परवानगी

4.52 कोटींचा घोटाळा : मंत्र्यांसह 6 जणांवर आरोप दाखल

दैनिक गोमन्तक

मडगाव : डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात सध्या मंत्री असलेले माजी विज मंत्री मोविन गुदिन्हो यांना 4.52 कोटी रुपयांचा वीज घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी आज दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने (South Goa Sessions Court) दिली. ही सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्या न्यायालयात चालू असून गुदिन्हो यांच्यावतीने आज सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी मागितली. या प्रकरणी आता 7 एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली. (Court allows former power minister Mauvin Godinho to be absent from power scam hearing)

1998 साली गुदिन्हो विजमंत्री असताना त्यांनी काही कंपन्यांना बेकायदेशीररित्या वीज बिलात माफी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मंत्र्यांबरोबर त्यावेळचे मुख्य वीज अभियंते, दोन कंपन्या आणि अन्य चार जणांवर फसवणूक करणे आणि भ्रष्टाचार (Corruption) करण्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले होते.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री (CM) असताना त्यांनी हा प्रकार उघडकीस आणून या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते त्यानंतर 24 वर्षांनी ही सुनावणी सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: 130 कोटींचा घोटाळा उघड, सर्वांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी दिली तंबी; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT