Goa COD Scam Dainik Gomantak
गोवा

COD Fraud: ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ करताय? लागू शकतो चुना; मुरगावात भामट्यांची टोळी सक्रिय, 12 जणांची फसवणूक

Vasco Courier Fraud: कुरियरवाल्याकडे हे पार्सल कोणी पाठविले, यासंबंधी चौकशी केल्यास आपल्याला काहीच माहीत नसल्याचे तो सांगतो. त्यामुळे त्याबाबत संशय व्यक्त होतो.

Sameer Panditrao

वास्को: कुरियर देणारा इसम आपल्या घरी किंवा ऑफिसात ६९९ रुपयांचे ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चे पार्सल घेऊन आल्यास सावधान! कारण गेल्या काही महिन्यांपासून वास्को परिसरात १२ जणांची फसवणूक झाली आहे. हा आकडा ज्ञात तक्रारींचा आहे. अन्यथा फसविल्या गेलेल्या लोकांची संख्या आणखी मोठी असू शकते.

आर्किटेक्ट अभिषेक भटनागर यांनी सांगितले की, मलाही अशा प्रकारचे पार्सल मिळाले. पार्सल घेऊन येणारा नेहमीचा कुरियरवाला असल्याने तसेच रक्कमही कमी असल्याने मी ‘सीओडी’ पद्धतीने पार्सल घेतले. घरातील कोणीतरी वस्तू मागवली असेल, अशी माझी समजूत झाली होती. परंतु पार्सल उघडल्यावर त्यात नको असलेली वस्तू नजरेस पडली. याप्रकरणी

कुरियरवाल्याला विचारले असता, त्याने कार्यालयाचा संपर्क नंबर दिला. मात्र, तेथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एकंदर हा व्यवहार संशयास्पद आहे. याप्रकरणी योग्य चौकशी व्हावी.

...म्हणूनच भामट्यांचे फावते

‘त्या’ पार्सलवर पाठविणाऱ्याचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक वगैरे काहीही नसते. फक्त ग्राहकाचे नाव, पत्ता आणि रक्कम असते. कुरियरवाल्याकडे हे पार्सल कोणी पाठविले, यासंबंधी चौकशी केल्यास आपल्याला काहीच माहीत नसल्याचे तो सांगतो. त्यामुळे त्याबाबत संशय व्यक्त होतो. परंतु कुरियरवाल्याने पैसे घेतले असल्याने काहीच करता येत नाही. ही रक्कमही फार मोठी नसल्याने लोकही या फसवणुकीबद्दल जास्त बोभाटा करीत नाहीत.

‘ती’ रक्कम नेमकी जाते कुठे?

ज्या कुरियर कंपनीच्या नावाने हे पार्सल डिलिव्हरी केले जाते, त्या कंपनीच्या वरिष्ठांना कदाचित या घोटाळ्याची कल्पनाही नसावी. त्या कुरियर कंपनीने आपले नाव खराब होण्यापूर्वीच या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. या घोटाळ्यात संबंधित कुरियर डिलिव्हरी करणारे सहभागी असतील, तर त्यांच्याविरोधात कारवाई होण्याची गरज आहे. त्या पार्सलवर विक्रेत्याचा नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक वगैरे नसते. मग तो डिलिव्हरी करणारा इसम त्याला ग्राहकाकडून मिळालेली रक्कम कोणाला पाठवितो, हा मोठा प्रश्न आहे.

कशी आहे मोडस ऑपरेंडी?

१ घरातील कोणीतरी वस्तू मागवली असेल, असे समजून काहीजण पैसे देतात आणि पार्सल घेतात. परंतु पार्सलमध्ये अतिशय हलक्या दर्जाचा साबण, शॅम्पू वगैरे गोष्टी मिळतात, ज्यांची प्रत्यक्षात किंमत दहा रुपयेही नसते.

२ परंतु ६९९ रुपयांसाठी कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने भामट्यांचे फावले आहे. यासाठी एका नावाजलेल्या कुरियर कंपनीचा वापर करण्यात येत आहे. यामागे एखादे रॅकेट आहे काय, याची पोलिसांनी संबंधित कुरियर कंपनीच्या कामगारांची, तसेच त्यांच्या स्थानिक कार्यालयाची चौकशी करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gen Z Protest in Nepal: सोशल मीडिया बॅनचा नेपाळला फटका, युवा पिढी आक्रमक; थेट संसदेत घुसुन तोडफोड Watch Video

Asia Cup 2025: 8 संघांचे 8 धुरंधर फलंदाज, आशिया कपमध्ये ठरतील 'गेमचेंजर'; जाणून घ्या कोण आहेत हे स्टार्स

सात मुली अनाथ झाल्या, गरीब कुटुंबाने कमवता पुरुष गमावला; गोव्यात रोजंदारी करणाऱ्या मजुराचा सर्पदंशाने मृत्यू

गोव्यात महिला न्यायाधीश आणि तिच्या पतीला धक्काबुक्की, रेस्टॉरंटमधून बाहेर हाकलंल; परस्परविरोधी गुन्हा नोंद

Kadamba Bus Accident: इलेक्ट्रिक कदंब झाली ब्रेकडाऊन, पार्क केलेल्या गाड्यांना दिली धडक; ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा

SCROLL FOR NEXT