Nomination For Chairperson And Vice Chairperson Dainik Gomantak
गोवा

Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

उद्या नवनिर्वाचित नगरसेवकांना शपथग्रहण व नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया होणार

Rajat Sawant

फोंडा व साखळी नगरपालिकेच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीनंतर आता या नगरपालिकेवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्हणून कोण विराजमान होणार याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज सोमवारी या दोन्ही पदांसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत होती.

फोंडा व साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी रश्मी देसाई यांनी तर उपनगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते व दुसऱ्या वेळी निवडून आलेले आनंद काणेकर यांनी अर्ज सादर केला आहे.

फोंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक आणि उपनगराध्यक्ष पदासाठी दिपा शांताराम कोवलेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवानंद सावंत व वेदिका वळवईकर यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

मंगळवार, 16 रोजी सकाळी नवनिर्वाचित नगरसेवकांना शपथग्रहण व नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

साखळीची नगरपालिका निवडणूक ही यावेळी बरीच लक्षवेधी व प्रतिष्ठेची होती. तर निकालही तसा लक्षवेधीच व धक्कादायक ठरला. भाजपने मतदान झालेल्या सर्व दहाही प्रभागांमध्ये निर्विवाद वर्चस्व राखत ही नगरपालिका एकहाती आपल्याकडे खेचून आणली. बारा सदस्यीय या नगरपालिकेवर एक बिनविरोध व दहा उमेदवार मतदानातून निवडून आणत भाजपने अकरा नगरसेवक निवडून आणले.

फोंड्यात भाजपने मंत्री रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळविले. रवी यांचे दोन्ही पुत्र रितेश आणि रॉय हे निवडून आले. भाजपने फोंड्यात 10 जागा मिळवत सत्ता ताब्यात ठेवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT