Goa Cotigao  Dainik Gomantak
गोवा

Cotigao: दक्षिण गोव्यातील खोतिगावचा देशात डंका; उत्कृष्ट पर्यटनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

Best Tourism Villages of India 2023 Award: खोतिगावला गेल्या वर्षीचा उत्कृष्ट पर्यटनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: काणकोणातील दुर्गम भागातील खोतिगावला गेल्या वर्षीचा उत्कृष्ट पर्यटनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. खोतिगाव पंचायत क्षेत्रात निसर्ग पर्यटनाला भरपूर वाव आहे. खोतिगाववासीयांनी आतापर्यंत जपलेल्या पुरातन संस्कृतीमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला, असे सरपंच आनंदू देसाई यांनी सांगितले.

खोतिगाव पंचायत क्षेत्रात कुस्के हा प्रसिद्ध धबधबा आहे. शिवाय पोर्तुगिजांनी जिलबा राणे यांच्यावर बंदुकीची गोळी झाडली, त्याठिकाणी महादेव देवालय आहे. तसेच जैवविविधतेने समृद्ध असलेले खोतिगाव अभयारण्य आहे. या पंचायत क्षेत्रात यापूर्वी ऑयस्टर मशरूम कल्टिवेशन तसेच बेत (केन) कार्यशाळा झाल्या आहेत.

येथे सेंद्रिय गूळनिर्मिती करण्यात येते, असे माजी सरपंच दया गावकर यांनी सांगितले. खोतिगाव हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यास भरपूर वाव आहे. खोतिगाव अभयारण्याचा नव्वद टक्के भाग खोतिगाव पंचायत क्षेत्रात आहे. अभयारण्यातील तुळशीमाळ, ट्री टॉप व अन्य पाणवठे पर्यटनदृष्ट्या विकसित केल्यास पर्यटन बहरेल, असे दया गावकर यांनी सांगितले.

खोतिगावातील अतिदुर्गम अशा केरी डोंगरावर असलेल्या वाड्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे गरजेचे आहे. येथे बारमाही तापमान २० अंशांपेक्षा कमी असल्याने हा वाडा थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करणे शक्य आहे. शिवाय रोप-वे व अन्य साहसी उपक्रम या ठिकाणी राबवून निसर्गप्रेमी पर्यटकांना आकर्षित करणे शक्य आहे. याठिकाणी बोरशे हे पवित्र तळे आहे, असे गावकर म्हणाले.

खोतिगाव पंचायत क्षेत्रात कुष्टे येथे दूध ग्राम वसविण्याची आमची इच्छा होती. या पंचायत क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. गावातील युवक सक्षम व्हावेत, हाच हेतू आहे.
रमेश तवडकर, सभापती
खोतिगाववासीयांनी आतापर्यंत येथील पुरातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन केले आहे. त्याचेच फलीत म्हणून किंवा त्या वारशामुळेच खोतिगावला पर्यटनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आनंदू देसाई, सरपंच, खोतिगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT