Velsao Railway Issue  Dainik Gomantak
गोवा

Velsao Railway Issue : वेळसाववासीयांना दिलासा, सहा घरे वाचणार

रेल्वे पूर्वेकडील दुसरा ट्रॅक हलविणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Velsao Railway Issue : रेल्वेने पूर्वेकडील दुसरा ट्रॅक हलवून सुमारे सहा घरे वाचविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी दिली. या निर्णयामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळणार असल्याचे वास म्हणाले.

रेल्वे विकास निगम लिमिटेड आणि वेळसाव ग्रामस्थांमध्ये रेल्वे दुहेरी मार्गावरून शितयुद्ध चालू आहे. रेल्वे वेळसाव गावात अतिक्रमण करून आपलीच वडीलोपार्जित जागा रेल्वे दुपदरीकरणासाठी जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वडीलोपार्जित जागा कोणत्याही परिस्थितीत रेल्वेच्या घशात देणार नाही, असा पवित्रा या लोकांनी घेतला आहे. दरम्यान रेल्वे दुपदरीकरण प्रकरणी राजकारण न करता सामंजस्याने तोडगा काढण्याची गरज असल्याचे कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते.

दरम्यान, कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी आज दुपारी दक्षिण पश्चिम रेल्वे प्राधिकरण आणि कासावली पंचायत मंडळासह वेळसाव आणि कासावलीच्या लोकांसाठी प्रस्तावित अंडरपास जो कीत्येक वर्षापासून खितपत पडला आहे. अशा विविध साईट्सची पाहणी केली.

आक्रमक भूमिका

रेल्वे विकास निगमने आमची पारंपरिक वाट बंद केली आहे. आमच्या खासगी जमिनीत बांधकामाचे साहित्य ठेवले. कोणतीही परवानगी न घेता ते काम करीत आहेत. तेथील खासगी जमिनीमध्ये त्यांचे अतिक्रमण सुरू आहे, असा आरोप आल्विलो दोरादो रॉड्रिग्ज यांनी केला होता. त्यांच्यासह इतर ग्रासम्थांनीही यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतला होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT