MLA Antonio Vas Dainik Gomantak
गोवा

MLA Antonio Vas: कुठ्ठाळी येथील मार्केट कॉम्प्लेक्सचे लवकरच लोकार्पण

कुठ्ठाळीतील पांढरा हत्ती बनलेल्या मार्केट कॉम्प्लेक्सला मिळणार चालना

दैनिक गोमन्तक

वास्को: कुठ्ठाळीतील पांढरा हत्ती बनून राहिलेल्या मार्केट कॉम्प्लेक्सला लवकर चालना मिळणार असून त्याविषयी कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक यांनी मार्केटची - पाहणी करुन लवकरच ते लोकार्पण करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

(Cortalim market complex Inauguration soon MLA Antonio Vas)

ठाणा कुठ्ठाळी येथे मार्केट कॉम्प्लेक्स बांधून लोकार्पण करून तीन वर्षे झाली. मात्र आजपर्यंत या मार्केटमध्ये एक दोन विक्रेते वगळता अजून कोणीही आपला व्यवसाय थाटलेला नाही. 24 ऑक्टोबर 2013 साली मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते सदर मार्केटची पायाभरणी करण्यात आली.

कुठ्ठाळीच्या तत्कालीन आमदार एलिना साल्ढाणा या नंतर 28 जानेवारी 2019 साली सदर मार्केटचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले होते. मात्र सदर मार्केट कॉम्प्लेक्समध्ये व्यवसायिक बसण्यास धजावत असल्याने मार्केट कॉम्पलेक्स पांढरा हस्ती बनून राहीला आहे.

दरम्यान कुठ्ठाळीचे नवनिर्वाचित आमदार आंतोनियो वास यांनी सदर प्रकण्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी पाठपुरावा करून सदर मार्केट लोकांसाठी कार्यरत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आज सकाळी गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक तसेच महामंडळाचे व्यवस्थापक ज्यूड कारव्हालो कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया पेरेरा व संबंधीतांनी कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांच्यासमवेत सदर मार्केट प्रकल्पाची पाहणी केली असता त्यांना या मार्केटमध्ये अनेक त्रुटी जाणवल्या. सदर मर्केट बंद असल्याने याठीकाणी कुत्रे मांजरांनी घाण करून ठेवली आहे. तसेच येथे दारुच्या बाटल्या टाकून दिलेल्या आढळल्या.

दरम्यान महामंडळाचे उपाध्यक्ष दिपक नाईक यांनी पाहणी केल्यानंतर या प्रकल्पाविषयी त्रूटी जाणून घेतल्या व त्या लवकरच पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांनी बोलताना जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष नाईक यांनी मार्केट प्रकण्याची पाहणी केली असून बाजार संकुलाचे काही नूतनीकरणाचे काम होणार असून लवकरच या जागेत शासकीय कार्यालये स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कुठ्ठाळी पंचायतीच्या सरपंच सेनिया पेरेरा यांनी या बाजार संकूलात रस्त्याच्याकडेला बसणाऱ्या विक्रेत्यांचे स्थलांतर करून रस्त्यावर बसणाच्या विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सदर मर्केट प्रकल्प सुरू करण्याअगोदर या प्रकल्पात शासकीय कार्यालयांचे लवकरच स्थलांतर करणार असल्याचे आमदार वास यांनी सांगितले. जेणेकरून लोकांची वर्दळ या मार्केटमध्ये दिसेल व दुकानदारांना आपला व्यवसायही करण्यास मिळेल असे ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT