Cortalim Illegal Hill Cutting Dainik Gomantak
गोवा

डोंगर माफियांची खैर नाही! डोंगरकापणीवरून कुठ्ठाळीतील राजकारण तापले; चौकशीच्या फेऱ्यात अडकणार दोषी

Cortalim Illegal Hill Cutting: कुठ्ठाळी मतदारसंघात बेकायदा डोंगरकापणी नको, जे बेकायदा डोंगरकापणी करतात त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचा इशारा

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: कुठ्ठाळी मतदारसंघात बेकायदा डोंगरकापणी नको, जे बेकायदा डोंगरकापणी करतात त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचा इशारा कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी आज येथे दिला. कुठ्ठाळी मतदारसंघात डोंगरकापणी होते याची माहिती काहीवेळा मला किंवा पंचांना नसते. त्यामुळे तेथील रहिवाशांनी आमच्या नजरेस ही गोष्ट आणून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कुठ्ठाळी मतदारसंघातील मेटास्ट्रीप येथे डोंगरकापणी होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आमदार वाझ यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. यानंतर त्यांनी टीसीपी खाते, मुरगावचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, वेर्णा पोलिस निरीक्षक, दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालय, आयडीसी, कुठ्ठाळीचे सरपंच, सचिव, दक्षिण गोवा कोमुनिदाद अध्यक्ष,

कुठ्ठाळी कोमुनिदाद अध्यक्ष, अटर्नी आदींना पत्रे पाठवून या प्रकरणी योग्य ती चौकशी करण्याची सूचना केली होती. आमदार वाझ यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयात बैठक घेऊन चर्चा केली. त्यांच्याकडून योग्य ती माहिती जाणून घेतली.

त्या अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले. या प्रकरणी माहिती देताना आमदार वाझ यांनी काही गोष्टी उघड केल्या. कुठ्ठाळी मतदारसंघात जी डोंगरकापणी होते ती वैध की अवैध यासंबंधी आपणास काहीच माहिती नसते. त्या डोंगरकापणीस कोणी परवानगी दिली असल्यास तसे जाहीर करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

मेटास्ट्रीप येथे झालेली डोंगरकापणी ही आयडीसी व कोमुनिदाद यांच्या जागेवर झाली आहे. त्यामुळे त्यांनी योग्य ती माहिती देण्याची गरज होती. आयडीसीने संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत, त्यामुळे जबाब आल्यावरच काही गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले.

कोमुनिदादच्या भूमिकेबद्दल नाराजी

कुठ्ठाळी कोमुनिदादच्या जमिनीमध्ये काहीवेळा बेकायदा डोंगरकापणी होते. तथापी, कोमुनिदादचे पदाधिकारी कारवाई करीत नाहीत. त्यांना आजच्या बैठकीला बोलाविण्यात आले होते, परंतु ते आले नाहीत. यामागील कारण समजत नसल्याचे वाझ म्हणाले. कोमुनिदादच्या एकंदर भूमिकेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अध्यक्ष, ॲटर्नींची बैठकीकडे पाठ

कोमुनिदादचे अध्यक्ष, अटर्नी यांना बैठकीला बोलाविण्यात आले होते. तथापी, त्यांनी पाठ फिरवल्याने आमदार वाझ नाराज झाले. कोमुनिदादच्या जमिनीवर डोंगरकापणी होत असेल, तर संबंधितांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कोमुनिदादने आपल्या जमिनीबाबत योग्य ते सीमांकन करण्याची गरज आहे. त्यामुळे कोमुनिदादची जमीन असल्याचे स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT