Cortalim Waste Missing file Case Dainik Gomantak
गोवा

Cortalim: कोन्सुआतील कचरा प्रकरणाची फाईल गायब! कुठ्ठाळी पंचायत करणार पोलिस तक्रार दाखल

Cortalim Missing file Case: राष्ट्रीय महामार्ग ब्लू बॅरी समोरील सर्वे क्रमांक १२८/१ या कोमुनिदादच्या जमिनीत टॉमी कारवालो नामक व्यक्तीने वास्कोतील शिपयार्डमधून घातक टाकाऊ कचरा आणून येथे टाकला होता.

Sameer Panditrao

कुठ्ठाळी: नुकत्याच झालेल्या कुठ्ठाळीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ जॉयल फर्नांडिस यांनी आपण उपस्थित केलेल्या प्रस्तावाबाबत स्पष्टीकरण मागितले असता संबंधित प्रकरणाशी संबंधित फाइल पंचायत कार्यालयातून गायब झाल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. सभा सुरू असताना सरपंच व सचिवांनी कर्मचाऱ्यांना फाइल शोधायला लावली पण सापडली नाही. दरम्यान, याबाबत पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग ब्लू बॅरी समोरील सर्वे क्रमांक १२८/१ या कोमुनिदादच्या जमिनीत टॉमी कारवालो नामक व्यक्तीने वास्कोतील शिपयार्डमधून घातक टाकाऊ कचरा आणून येथे टाकला होता. याची व्याप्ती १२० मिटर लांबी तर १८ मिटर रुंदी एवढ्या परिसरात होती. त्यामुळे जॉन फिलिप परेरा यांनी याबाबत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्षांना तक्रार दाखल केली.

त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने १/७/२०२१ मध्ये कुठ्ठाळी पंचायत सचिवांना आदेशवजा पत्र पाठवून कचरा टाकणाऱ्यांकडून संबंधित घातक टाकाऊ कचरा हटवावा तसेच जमीन पूर्ववत करावी व झालेला खर्च वसूल करावा, असे निर्देश दिले होते. पंचायत सचिवांनी संबंधित कचरा टाकणारे टॉमी कारवालो यांना नोटीस पाठवून तो कचरा हटविण्याची ताकीद दिली होती.

पण आजपर्यंत तो कचरा तेथून हटवला गेला नाही. सध्या याबाबत कुठ्ठाळी पंचायतीनेही हात वर काढल्याचे जाणवते तर दुसऱ्या बाजूने संबंधित प्रकरणातील फाइल सुद्धा गायब झालेली आहेत. याबाबतीत आता कुठ्ठाळीतील ग्रामस्थ पंचायत किंवा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

SCROLL FOR NEXT