वास्को: सत्रांत-कुठ्ठाळी येथील वालंकिणी चॅपेलजवळ बुधवारी रात्री सुमारे पावणेबाराच्या दरम्यान झालेल्या अपघातात दोन स्कूटरस्वार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. वेर्णा पोलिसांनी प्रदीप पिल्लई (कुठ्ठाळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हा बुधवारी रात्री सत्रांत येथील ‘स्नॅक फास्ट फूड’ येथून कुठ्ठाळी चौकाकडे आपल्या स्कूटरने निघाला होता. योग्य खबरदारी न घेता त्याने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी स्कूटर पाहून त्याचा स्वतःच्या स्कूटरवरील ताबा सुटला.
त्यामुळे त्याची स्कूटर समोरून येणाऱ्या स्कूटरवर आपटली. यामुळे पिल्लई व दुसरा स्कूटरस्वार हर्षित व्दिवेदी (ठाणे - महाराष्ट्र) हे रस्त्यावर पडले. त्यामुळे दोघांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. या अपघात प्रकरणी वेर्णा पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक परेश फळदेसाई पुढील तपास करीत आहेत.
कळंगुटमधील बागा समुद्रकिनारी फिरणाऱ्या महिला पर्यटकास विनाकारण अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी अतेद्रा सिंग (२३) मूळ राजस्थान याला रितसर अटक केली. अतेद्रा सिंग हा बागा येथे एका खासगी रेस्टॉरंटमध्ये कामाला होता.
गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने ड्युटीवरील पर्यटक पोलिस शिपायाने अतेद्रा सिंग याला रंगेहाथ पकडले. संशयित कळंगुट पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, परप्रांतीय दलाल तसेच टाऊट्समुळे गोव्याची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत असून पर्यटनाला काळा डाग लागतो आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.