SGPDA Meeting Dainik Gomantak
गोवा

‘एसजीपीडीए’त मागील अध्यक्षांच्या कार्यकाळात गैरव्यवहार!

चौकशीची तयारी; घोळामुळे नूतन अध्यक्ष दाजी साळकरही अचंबित

दैनिक गोमन्तक

मडगाव : येथील एसजीपीडीएच्या व्यवहारात गत अध्यक्षांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष दाजी साळकर यांनाही धक्का बसला आहे. एसजीपीडीएच्या तिजोरीत जो महसूल जमा होणे अपेक्षित होते तेवढा जमाच झाला नसल्याचे उघड झाले असून. या साऱ्या व्यवहाराची चौकशी केली जाणार असल्याचे साळकर यांनी सांगितले.

प्राधिकरण मंडळाची पहिली बैठक काल गुरुवारी झाली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना साळकर यांनी प्राधिकरणात घोळ झाल्याचे मान्य केले. त्याला जबाबदार कोण हे सांगणे कठीण असले तरी त्यावेळी प्राधिकरणात जे अधिकारी होते त्यांनी हे होऊ कसे दिले याचेच आश्चर्य वाटते असे साळकर म्हणाले.

एसजीपीडीएच्या सोप्याची पावणी करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही मागच्या अध्यक्षांच्या कार्यकाळात एका खासगी कंत्राटदाराकडून ही वसुली केली जात होती. त्याने ज्या प्रमाणात वसूली केली त्या प्रमाणात प्राधिकरणाच्या तिजोरीत पैसा जमा केलाच नाही असे उघड झाले आहे. त्यामुळे प्राधिकरणाची स्थिती सध्या उत्पन्न कमी आणि देय रक्कम ज्यादा अशी परिस्थिती झाली आहे. या प्रकारामुळे प्राधिकरण आर्थिक अडचणीतही आले आहे.

सध्या प्राधिकरणाचे मासळी मार्केटमध्ये वापरलेल्या पाण्याचे लाखो रुपयांचे बिल देणे बाकी आहे. ही बिले त्यावेळीच का फेडली नाहीत याबद्दल साळकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. सरकारने आम्हाला या प्राधिकरणावर काही तरी चांगले काम करण्यासाठी पाठविले आहे. निदान यापुढे तरी आम्ही प्राधिकरणाचा फायदा कसा होईल तसेच निर्णय घेऊ, असे दाजी साळकर म्हणाले.

विक्रेत्याकडून सोपोची वसुली आता प्राधिकरणाद्वारेच करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे दाजी साळकर यांनी सांगितले. सांगितले. धाऊक आणि किरकोळ मासळी मार्केट बांधकाम हाती घ्या अशी सूचना करीत पार्किंग सुविधाही चांगल्या करण्यावर प्राधिकरणाने भर देण्याचे ठरविले आहे, असे दाजी साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Old Goa: ओल्ड गोव्यातील संरक्षित क्षेत्रात होणाऱ्या पोलिस स्थानकाच्या इमारतीला विरोध; जॉन मस्कारेन्हास यांचे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाला पत्र

Ponda: फोंड्यातील व्यापाऱ्यांचे स्थलांतर! कपडे व्यापारी प्रतीक्षेत; मासळी बाजारात नवी इमारत

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! वाहनांवरील बंदी वाढणार, दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू; लॉरी व ट्रकचालक नाराज

Goa: गोव्यातील 10 शिक्षकांना मुख्‍यमंत्री वशिष्‍ठ गुरू पुरस्‍कार जाहीर, शिक्षकदिनी होणार वितरण; वाचा संपूर्ण यादी..

Ganesh Idol: चिमुकल्याने घरच्या घरी बनवली 'गणेशमूर्ती'! विसर्जनानंतर मातीचाही उपयोग; विधायक गणेशोत्सव

SCROLL FOR NEXT