Purple Fest Dainik Gomantak
गोवा

Purple Fest: ‘पर्पल फेस्ट’च्या निविदेत भ्रष्टाचार

पर्पल फेस्ट’च्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान कार्यालयाला सोशल मीडियावर टॅग करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Purple Fest: गोव्यात नुकत्याच झालेल्या पर्पल फेस्टच्या निविदेतील फसवणुकीला दुजोरा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या घोषणेला तिलांजली दिली आहे. या फेस्टच्या निविदेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या काँग्रेसने पर्दाफाश केला होता, त्याकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष करणे धक्कादायक असल्याचे मत काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘मन की बात'' मध्ये गोव्यात झालेल्या पर्पल फेस्टचा उल्लेख केला. त्यावर पणजीकर म्हणाले, भ्रष्ट डबल इंजिन भाजप सरकार जनतेच्या पैशाची लूट करताना दिव्यांगांनाही सोडत नाही.

या घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान कार्यालयाला सोशल मीडियावर टॅग करण्यात आले होते, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. निविदा उघडण्याच्या नियोजित दिवसापूर्वीच कंत्राटदाराने त्याचे काम कसे सुरू केले होते, हे आम्ही व्हिडिओ पुराव्यासह उघड केले होते.

निविदेची बोली उघडण्याची तारीख 2 जानेवारी 2023 असताना साधारण 29 डिसेंबर 2022 रोजीच गोवा मनोरंजन संस्थेच्या प्राकारात कंत्राटदाराचे काम सुरू झाले होते, हे व्हिडिओतून दाखविले होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे याविषयी लेखी तक्रार केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT