disabled person Dainik Gomantak
गोवा

Goa: दिव्यांगांना कार्पोरेट क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यासाठी ‘जीसीसीआय’ प्रयत्नशील

दिव्यांगांमधील जे लोक कुशल आहेत, त्यांना गोव्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळणे आवश्‍यक आहे. त्यांना त्या मिळवून देण्यासाठी जीसीसीआय प्रयत्नशील आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (जीसीसीआय) मजूर आणि रोजगार खाते आणि दिव्यांगजन आयोगाच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना कार्पोरेट क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशी माहिती जीसीसीआयचे अध्यक्ष राल्फ डिसोझा जीसीसीआयने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, संजय केंद्राचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळकर, एनेब्लेर, एनेबल इंडियाचे मुख्य संस्थापक शांती राघवन यांची उपस्थिती होती.

डिसोझा म्हणाले की, जीसीसीआय ही गोव्यात होत असलेल्या ‘पर्पल फेस्ट’ची भागीदार आहे. दिव्यांगांसाठी ता.7 रोजी मॅकेनिज पॅलेसमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3.30 वा. या वेळेत रोजगार आणि उदरनिर्वाहाचे साधन याविषयावरील खास सत्र होणार आहे.

दिव्यांगांमधील जे लोक कुशल आहेत, त्यांना गोव्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळणे आवश्‍यक आहे. त्यांना त्या मिळवून देण्यासाठी जीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यांना सहजतेने नोकरी मिळेल, असा प्रयत्न एकत्रितरित्या करणे गरजेचे आहे. याप्रसंगी राघवन, कुंकळकर, पावसकर यांनी पर्पल फेस्टविषयी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT