पणजी: गोव्यात (Goa) प्रवेश (Entry) करणाऱ्यांना 72 तासांपर्यंतचा कोविड चाचणी निगेटिव्ह अहवाल (COVI19 Report) किंवा लसीकरणाचा (Vaccination) पुरावा सक्तीचा करण्यासंदर्भात घातलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारने केलेला अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Goa bench of bombay high court) फेटाळला व जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा नव्याने अर्ज करण्यास मुभा ठेवली आहे. कोरोना स्थिती पाहता गोव्यातील प्रवेश सरसकट खुला करणे शक्य नाही असे निरीक्षण खंडपीठाने केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या वाहनावरील चालक व क्लिनर वगळता गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणी निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरणाचा पुरावा सादर करण्यावर खंडपीठाने आज पुन्हा शिक्कामोर्तब केले.(Corona test mandatory for entry into Goa)
सरकारतर्फे बाजू मांडताना ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले, की गोव्याची महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी घातलेल्या निर्बंधाशी तुलना करता येणार नाही. ही दोन्ही राज्ये मोठी आहेत व त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कामासाठी मजूर आहेत. गोव्याची तुलना ही दिल्लीशी करणे योग्य आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिल्ली सरकारने दिल्ली निवासी असलेल्या तसेच कामानिमित्त दिल्लीत येणाऱ्यांना कोविड चाचणी अहवाल सक्तीचा केलेला नाही. त्यामुळे गोव्यासाठी तो लागू होतो. यावर गोवा खंडपीठाने हस्तक्षेप करत मार्गदर्शक तत्त्वांच्या काही आवश्यक भागाचा वापर सरकारने करणे योग्य नाही, असे म्हटले आहे.
खंडपीठाने नोंदविली ही निरीक्षणे
1) राज्यातील वैद्यकीय साधनसुविधांवर मोठा ताण असल्याचे सरकारने कागदोपत्री सादर केले आहे, तर गोव्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोणतेही निर्बंध न घातल्यास ही वैद्यकीय साधनसुविधा पूर्णपणे कोलमडेल.
2) कोविड चाचणी निगेटिव्ह अहवाल फक्त रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठीच नव्हे, तर इतर मार्गाने येणाऱ्यांसाठीही सक्तीचा आहे.
3) राज्यातील कोरोना संसर्ग स्थिती न पाहता गोव्यातील प्रवेशासाठी कोविड चाचणी निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पुरावा सक्तीचा दिलेला आदेश रद्द करण्याची सरकारने विनंती केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.