Tourists on the sea shore in Goa 

 

Dainik Gomantak 

गोवा

कोरोनाचे निर्बंध कागदावरच; किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) तब्बल 7.23 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: बुधवारपासून राज्य सरकारने कोरोनाच्या संदर्भातील निर्बंध लागू केले. मात्र ते केवळ कागदावरच असल्याचे आज स्पष्ट झाले. कारण नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक गोव्यात दाखल झाले असून सर्वत्र नव्याने घातलेल्या नियमांचा फज्जा उडून उल्लंघन झालेले दिसत होते. पोलिस कारवाइ करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी पोलिसांकडूनही दुर्लक्ष होताना दिसले.

त्यामुळे बेधुंद पर्यकांकडून (Tourists) नियमांची एशीतैशी होत आहे. उल्लेखनिय म्हणजे, संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) तब्बल 7.23 टक्क्यांवर पोहोचला. 24 तासात नव्या 261 रुग्णांची भर पडली त्यामुळे राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 856 वर गेली आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमानुसार कॅसिनो, सभागृह, रिवर क्रूज, वॉटर स्पोर्ट्स मनोरंजन पार्क 50 टक्के आसन क्षमतेने चालवावे लागणार आहेत. मात्र, कॅसिनोसह वॉटर पार्क, वॉटर स्पोर्ट्स आणि रिव्हर क्रूज तुडुंब भरून वाहताना दिसत होते. समुद्रकिनाऱ्यांवर तर कोणत्याच नियमांचे पालन केलेले दिसत नाही. सर्वत्र मास्क (Mask) अनिवार्य असताना बहुतांश लोक मास्कचा वापर करत नव्हते. कॅसिनो आणि रिव्हर क्रूजमध्ये तर मोठी गर्दी दिसत आहे. याशिवाय सॅनिटायझरचा वापर, थर्मल गणच्या सहाय्याने तापमानाची तपासणी करणे आवश्यक असताना याचा वापरही कुठे दिसत नाही. हा निष्काळजीपणाचा अंतिम परिणाम राज्यात कोरोनाची (Coronavirus) लाट पसरण्यावर होईल अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नवे 261 रुग्ण, एकाचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 660 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 1 लाख 76 हजार 283 रुग्ण बरे झाले आहेत. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.58 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 856 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामूळे एका रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 521 झाला आहे. गुरुवारी दिवसभर 3 हजार 610 संशयित नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी तब्बल 261 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सध्या राज्य सरकारच्या वतीने कोरोना प्रसार रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासाठी नागरिक आणि पर्यटकांच्या सहकार्याची गरज आहे. अन्यथा याचा परिणाम आपल्या सर्वांना भोगावा लागेल. पर्यटकांनी आणि नागरिकांनी गर्दीची ठिकाणे आणि पार्ट्यामध्ये जाणे टाळावे. कोरोनाच्या नियमांचे पालन करावे

- डॉ. शेखर साळकर

नवीन वर्षाच्या (New Year) प्रारंभीच कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणे हे राज्यासाठी चिंतेची बाब आहे. यासाठी तज्ज्ञ समितीशी विचारविमर्श सुरू आहे. अमेरिकास्थित जीनोम सिक्वेलिंग तपासणीसाठी एक मशीन लवकरच राज्यात दाखल होत आहे. याबरोबर राज्य सरकार अशाच स्वरूपाची नवीन मशीन खरेदी करण्याच्या प्रयत्नात असून तसा प्रस्ताव अर्थखात्याकडे पाठवला आहे. ही मशीन कार्यान्वित झाल्यानंतर कोरोला व्हेरियन्ट संदर्भातली माहिती तातडीने मिळेल.

- विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

संपूर्ण जग ओमिक्रॉनमुळे चिंतेत आहे. राज्यात मात्र सर्वसामन्य जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे. ओमिक्रॉनचा (Omicron variant) रुग्ण सापडल्यानंतरही सरकारने ताबतोब निर्बध लावण्याची गरज होती. आता निर्बंध लावले असले तरी त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे चिंता वाटते.

- दिगंबर कामत (विरोधी पक्षनेते)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT