Cordelia Cruise in Goa

 
Dainik Gomantak
गोवा

मुंबई ते गोवा कॉर्डेलिया क्रूझमधील 66 प्रवाशांना कोरोनाची लागण

कोरोनाबाधित प्रवाशांसोबत मुंबई ते गोवा क्रूझ पुन्हा माघारी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात (Goa) दाखल झालेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील प्रवाशांसमोरील (tourist) अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. या क्रूझची सेवा 5 जानेवारीपर्यंत बंद राहणार असून तब्बल 66 प्रवासी कोरोनाबाधित (Covid-19) आढळल्यानंतर आता हे क्रूझ पुन्हा मुंबईला (Mumbai) नेलं जाणार आहे.

मागच्या आठवड्यात मुंबईहून सुमारे 2000 पर्यटकांना घेऊन आलेल्या कॉर्डेलिया क्रूझ (Cordelia Cruise) मधील काही प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने जहाजाला मुरगाव बंदरात प्रवेश नाकारण्यात आला होता. जहाजातील प्रवाशांसह क्रूझ मेंबरनाही सक्तीने कोविड चाचणी (Corona Test) करायला लावली होती. जो पर्यंत सर्व प्रवाशांची चाचणी होत नाही तोपर्यंत जहाजाला एमपीटी बंदरात क्रुझ टर्मिनलवर प्रवेश नाकारण्यात आला होता.

प्रवाशांच्या कोरोना चाचणीचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला आहे, ज्यात तब्बल 66 प्रवासी कोरोनाबाधित सापडले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसह हे क्रूझ मुंबईला (Mumbai) परत नेलं जाणार आहे. दरम्यान गोव्यात विलगीकरणात असलेल्या क्रूझवरील 6 मेंबरना सध्या इथेच ठेवलं जाणार आहे.

क्रूझमधील 2000 प्रवाशांपैकी 66 प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हाधिकारी आणि एमपीटी कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे. जहाजातून प्रवाशांना खाली उतरवण्याची परवानगी द्यायची की नाही, याचा सर्वस्वी निर्णय संबंधित अधिकारी घेतील, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी ट्विटद्वारे कळवले होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होतं. आता हे क्रूझ पुन्हा मुंबईला रवाना केलं जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT