Uday Bhembre Dainik Gomantak
गोवा

Ponda: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य! उदय भेंब्रे यांच्या विरोधात फोंडा, फातोर्डात पोलिस तक्रार

Uday Bhembre: उदय भेंब्रे यांनी याप्रकरणी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत मुख्यमंत्री सावंत यांनी शिवरायांचा सांगितलेला इतिहास खोटा असल्याचे म्हटले होते.

Pramod Yadav

पणजी: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी लेखक, माजी आमदार उदय भेंब्रे यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोव्यात शिवशाही नव्हती आणि शिवरायांमुळे गोव्यातील धर्मांतरण थांबल्याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलेला इतिहास खोटा असल्याचे भेंब्रे यांनी म्हटले होते. भेंब्रे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात देखील तक्रार दाखल झालीय.

शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात सहा तालुक्यांत शिवशाही होती तसेच, शिवरायांमुळे गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला होता, असे वक्तव्य केले होते. लेखक उदय भेंब्रे यांनी याप्रकरणी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलेला इतिहास खोटा असल्याचे म्हटले होते.

गोव्यात शिवशाही नव्हती तसेच, शिवरायांमुळे गोव्यातील धर्मांतरण थांबले नाही, असे भेंब्रे यांनी म्हणत मुख्यमंत्री सावंत यांचा दावा खोडून काढला होता. यावरुन राज्यात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भेंब्रे यांच्या घरासमोर निदर्शने करत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली. रात्रीच्या वेळेस भेंब्रे यांच्या घरासमोर घडलेल्या या प्रकारावरुन भेंब्रे यांच्या समर्थनात साहित्यिक आणि राजकीय नेते मैदानात उतरले होते. दरम्यान, कुंकळ्ळी येथे भेंब्रे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले. यावरुन भेंब्रे यांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, यानंतर आता भेंब्रे यांच्याविरोधात देखील तक्रार दाखल झाली आहे.

समर्थन आणि निषेध सभा

घडलेल्या प्रकारानंतर उदय भेंब्रे यांच्या समर्थनात नुकतेच सभा पार पडली. यासभेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिस चौकशी केली जावी तसेच, भेंब्रे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे असे ठराव पारित करण्यात आले. दरम्यान समर्थनात झालेल्या सभेनंतर आता उदय भेंब्रे यांच्या निषेधार्थ मंगळवारी (०४ मार्च) कुंकळ्ळीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT