IPS Jaspal Singh And Alok Kumar Dainik Gomantak
गोवा

Goa New DGP: आसगाव प्रकरण भोवले! पोलिस महासंचालकांची अखेर बदली, कोण आहेत गोव्याचे नवे डिजीपी?

DGP Jaspal Singh Transfer: आसगाव घरमोडतोड प्रकरणामुळे वादात सापडलेल्या पोलिस महासंचालक यांची अखेर बदली झाली आहे.

Pramod Yadav

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोड प्रकरणामुळे वादात सापडलेल्या पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची अखेर बदली झाली आहे. आसगाव येथील कारवाईसाठी जसपाल यांचा दबाव होता, असा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बदलीची मागणी सर्वस्तरातून केली जात होती. अखेर प्रकरण घडल्याच्या वीस दिवसांनतर जसपाल सिंग यांची बदली करण्यात आली आहे.

Home Ministry Order

केंद्रीय गृह खात्याने याबाबत बदली आदेश जारी केले आहेत. गोव्याच्या पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी अलोक कुमार यांच्याकडे देण्यात आली आहे. अलोक कुमार 1996 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोड प्रकरणानंतर जसपाल सिंग यांच्यावर बदलीची टांगती तलवार होती. हणजूण पोलिस निरीक्षक प्रशल देसाई यांनी राज्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात जसपाल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आसगाव येथील कारवाईसाठी जसपाल यांनीच दबाव आणल्याचे या अहवालात म्हटले होते.

यानंतर जसपाल यांच्या बदलीची मागणी जोर धरु लागली होती. जसपाल यांच्या बदलीबाबतचा अहवाल देखील राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला होता. यानंतर जसपाल यांची बदली होणार हे निश्चित झाले होते. अखेर या प्रकरणाच्या वीस दिवसांनंतर जसपाल यांची दिल्लीत बदली झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT