तोच जल्लोष, स्थळ नवे! सनबर्न आता दक्षिण गोव्यात
Sunburn Festival Goa 2024Dainik Gomantak

Sunburn Goa 2024: तोच जल्लोष, स्थळ नवे! सनबर्न आता दक्षिण गोव्यात

Sunburn Goa 2024: गोव्यात दरवर्षी उत्तरेत होणारा सनबर्न महोत्सव आता दक्षिण गोव्यात आयोजित केला जाणार आहे.
Published on

दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सव आता उत्तर गोव्यात नव्हे तर दक्षिण गोव्यात होणार आहे. सनबर्नने गोव्यातील त्यांचे स्थळ बदलले असून, ते दक्षिणेत स्थलांतरित केले आहे. सनबर्नच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली आहे.

यावर्षी २८ ते ३० डिसेंबर या काळात दक्षिण गोव्यात सनबर्न होईल. दरम्यान, महोत्सवाच्या स्थळाची माहिती अद्याप समोर आलेला नाही.

वर्षाअखेरीस गोव्या ईडीएम आणि जगातील नामांकीत डिजे सनबर्न महोत्सव आयोजित केला जातो. गेल्या वर्षी दरवर्षी होणाऱ्या वागातोर ऐवजी पेडण्यात महोत्सव आयोजित केला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. याला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केल्यानंतर वागातोर येथेच हा महोत्सव आयोजित करण्यात आला.

तसेच, ३१ तारखेला स्थानिकांच्या रोजगारावर गदा येथे म्हणून ३१ डिसेंबरला महोत्सवाचे आयोजन करु नये अशी मागणी कळंगुट स्थानिक आमदारांनी केली होती. त्यामुळे महोत्सव एक दिवसांने पूर्वीच गुंडाळण्यात आला. शिवाय महोत्सवात सादरीकरण केलेल्या डिजेंनी देखील गेल्या वर्षीच्या महोत्सवाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजनाची घोषणा केल्यानंतर आता यावरुन आरोप व्हायला लागला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावरुन भाजप सरकारवर टीका केली आहे.

तोच जल्लोष, स्थळ नवे! सनबर्न आता दक्षिण गोव्यात
Goa New DGP: आसगाव प्रकरण भोवले! पोलिस महासंचालकांची अखेर बदली, कोण आहेत गोव्याचे नवे डिजीपी?

उत्तर गोव्याला अमली पदार्थ आणि गुन्हेगारी हब केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांची वक्रदृष्टी दक्षिण गोव्याकडे वळवली आहे. दक्षिणेत सनबर्नला परवानगी देऊन दक्षिणेत लोकसभा पराभवाचा बदला घेण्यासाठी आणखी एक प्रयत्न, असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com