Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Zuari Land Scam: मुख्यमंत्र्यांच्या ‘झुआरी’वरील वक्तव्यावरुन होणार वादळी चर्चा; २७ रोजी सांकवाळ कोमुनिदादची विशेष सभा

Sancoale Comunidade: ज्या कारणासाठी कोमुनिदादने जमीन दिली आहे, त्याच कारणासाठी ती वापरली गेली पाहिजे यासाठी राज्य सरकार वटहुकूम जारी करणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानंतर ही सभा २७ ऑक्टोबर रोजी बोलावली असून त्यांच्या विशेष सूचीवर स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Zuari Land Scam Sancoale Comunidade Meeting About CM Pramod Sawant Statement

पणजी: सांकवाळ कोमुनिदादने बिर्ला ग्वालियर्स/ झुआरी उद्योग यांना १९७१ मध्ये दिलेल्या जमिनीबाबतचा विषय आता कोमुनिदादच्या विशेष सर्वसाधारण सभेत गाजणार आहे. ज्या कारणासाठी कोमुनिदादने जमीन दिली आहे, त्याच कारणासाठी ती वापरली गेली पाहिजे यासाठी राज्य सरकार वटहुकूम जारी करणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानंतर ही सभा २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बोलावली असून त्यांच्या विशेष सूचीवर स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे.

या बैठकीत २०१५ मधील सर्वसाधारण सभेत झुआरी ॲग्रो केमिकल्स लि. विरोधात अपिलात जाण्याचा निर्णय घेतला होता. तसे का केले नाही, याविषयीही या बैठकीत जाब विचारण्यात येणार आहे. सभेच्या विषय सूचीवर दुसऱ्या क्रमांकावर हा विषय नोंदविला आहे.

हा व्यवहार पूर्वी ‌कोमुनिदाद आणि खासगी कंपनीत झाल्यामुळे सरकारला या प्रश्नात फारसे काही करता येत नव्हते.

जमीन विक्रीची राज्यभर वदंता

या कंपनीसाठी सांकवाळ कोमुनिदादकडून १९७१ मध्ये केवळ २० पैसे प्रतिचौरस मीटर दराने तब्बल ५०० एकर म्हणजे २० लाख २३ हजार ५०० चौरस मीटर जमीन संपादित केली आहे. सध्या त्या जमिनीचा कमीत कमी दर २० हजार रुपये प्रतिचौरस मीटर आहे. त्यामुळे खतनिर्मिती प्रकल्प उभारून उर्वरित मोकळ्या जागेची विक्री करून मिळणारा नफा हा उद्योग चालवून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा कितीतरी पट जास्त असल्याने ही जमीन विक्री होत असल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे.

या कारणामुळे उद्‌भवला वाद

झुआरी ॲग्रो केमिकल्स लि. कंपनीची मालकी बदलल्यानंतर मोकळ्या असलेल्या मोठ्या भूखंडाचे छोटे तुकडे करून त्याची गृहनिर्माणासाठी विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये अशा संदर्भातील एका विक्री कराराला सरकारने स्थगितीही दिली आहे.

झुआरी जमीन घोटाळा म्हणून हा विषय सध्या गाजत आहे. त्यामुळे सरकारने वटहुकूम काढण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली आहे.

त्याचा संदर्भ देत आता ही विशेष सर्वसाधारण सभा बोलावल्याने या प्रश्नावर कोमुनिदाद कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

Goa Cabinet: मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच? मुख्यमंत्री सावंत म्हणाले की पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच....

Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य

Goa Trip: तर आता कन्फर्म कराच!! डिसेंबर जवळ आलाय; गोव्याला फिरायला जायचं आहे ना?

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

SCROLL FOR NEXT