Controlling political developments in Congress; Congress leader Mukul Wasnik Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसमधील राजकीय घडामोडी नियंत्रणात; काँग्रेस नेते मुकुल वासनिक

दिनेश गुंडू राव आणि अलेक्सो सिक्वेरा यांच्यासह रिट्झ क्लासिक, मिरामारमध्ये काँग्रेस बंडखोरीवर चर्चा करताना ते म्हणाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसमधील राजकीय घडामोडी नियंत्रणात आहेत. काहीही निर्णय घ्यायची वेळ आल्यास काँग्रेस विधीमंडळ पक्ष आणि प्रदेश काँग्रेस कमिटी एकत्र बसून निर्णय घेईल आशी माहिती काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी दिली. दिनेश गुंडू राव आणि अलेक्सो सिक्वेरा यांच्यासह रिट्झ क्लासिक, मिरामारमध्ये काँग्रेस बंडखोरीवर चर्चा करताना ते म्हणाले.

(Controlling political developments in Congress; Congress leader Mukul Wasnik)

आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबोंविरोधात गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर प्रदेश काँग्रेस अपात्रता याचिका दाखल करणार आहे. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मायकल लोबोंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यात आलं

यासोबतच काँग्रेसकडून मायकल लोबोंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यामुळे सभागृहातील काँग्रेस आमदारांची आसनव्यवस्था बदलण्याची विनंती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि सहा आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांना केली आहे

विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबो यांची काँग्रेस पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र आता आपण सभापती रमेश तवडकर यांना सादर केले आहे.

दुपारपर्यंत नवा विरोधी पक्षनेता निवडला जाईल आणि ती माहितीही सभापतींना सादर केली जाईल, असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलं आहे.

रविवारी रात्री काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मायकल लोबो यांना गोवा विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदावरुन काढल्याची घोषणा केली होती. याचवेळी मायकल लोबो आपल्या पत्नी दिलायला लोबो यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिसले होते. आता काँग्रेसकडून अधिकृतपणे तशा आशयाचं पत्र विधानसभा अध्यक्षांना सादर करण्यात आलं आहे. तसंच आज दिवसभरात नवीन विरोधीपक्षनेता निवडणार असल्याचे संकेतही काँग्रेसकडून देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT