Goa Omni Car Pothole Viral Video Dainik Gomantak
गोवा

Panjim: गोव्यात खड्डा बुजविण्यासाठी सरकारी कंत्राटदारने रोडरोलर म्हणून ओमनी कार वापरली, VIDEO व्हायरल

Goa Omni Car Pothole Viral Video: गोव्यात सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मडगावमधील बोर्डा परिसरात खड्डे बुजविण्याच्या कामात मोठी हलगर्जी उघडकीस आली आहे.

Sameer Amunekar

Margon Omni Car Pothole Viral Video

मडगाव: गोव्यात सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मडगावमधील बोर्डा परिसरात खड्डे बुजविण्याच्या कामात मोठी हलगर्जी उघडकीस आली आहे. येथील रस्त्यावर खड्डे बुजवताना एका सरकारी कंत्राटदाराने रोडरोलरऐवजी खराब झालेली ओमनी कार वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सने संताप व्यक्त करत संबंधित यंत्रणेवर टीकेची झोड उठवली आहे.

सामान्यतः खड्डा बुजविल्यानंतर त्या भागावर हॉटमिक्स टाकण्यापूर्वी'रोडरोलर' फिरवला जातो. मात्र या ठिकाणी, रोडरोलरऐवजी धूळखात पडलेली जुनी मारुती ओमनी व्हॅन थेट खड्ड्यावरून चालवण्यात आली. व्हॅनच्या पुढच्या चाकांच्या खाली वजन देत खड्डा बुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्टपणे व्हिडिओत दिसून आलं.

व्हिडिओ व्हायरल

या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ परिसरातील एका नागरिकाने मोबाईलमध्ये टिपला आणि तो अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

अभियंत्यांचे स्पष्टीकरण

यावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि सीवरेज कॉर्पोरेशन यांच्यात जबाबदारी झटकण्याचा प्रकार पाहायला मिळाला. पीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “रस्ता दुरुस्तीचे काम सीवरेज कॉर्पोरेशनमार्फत केले जात होते. आमच्याकडे नोंदणीकृत असलेलेच कंत्राटदार हि कामं करत असतात."

गोव्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यावर होणारे कामकाज अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. मात्र, सरकारी कंत्राटदारांकडून अशा प्रकारच्या 'जुगाड' पद्धतीचा वापर होणं आणि त्याला अभियंत्यांकडून समर्थन मिळणं ही बाब निश्चितच गंभीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT