Pilot In Goa: मोटरसायकल पायलट व्यवसायाचे संरक्षण करा! आलेमावांचे आवाहन; कर्नाटकातील बंदीचा गोव्यात परिणाम?

Yuri Alemao: कर्नाटकमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अलेमाव म्हणाले की, या परिस्थितीत परंपरागत ''मोटरसायकल पायलट'' यांना त्रास होऊ नये.
Yuri Alemao motorcycle pilot goa
Yuri Alemao motorcycle pilot goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील मोटरसायकल पायलटांच्या सेवेवर बंदी आणण्याचा न्यायालयीन आदेश येण्यापूर्वी सरकारने सक्रियपणे पुढे येऊन ''मोटरसायकल पायलटांचे'' संरक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते युरी अलेमाव यांनी शुक्रवारी केले.

कर्नाटकमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अलेमाव म्हणाले की, या परिस्थितीत परंपरागत ''मोटरसायकल पायलट'' यांना त्रास होऊ नये.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बाईक टॅक्सींबद्दलच्या आदेशाचा विचार करत आणि या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांवर लक्ष देत, गोवा सरकारने गोव्यातील पारंपरिक ''मोटरसायकल पायलटांचे'' संरक्षण करण्यासाठी आणि ही सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रियपणे पुढे यावे. ही सेवा न्यायालयाच्या कोणत्याही बंदीच्या आदेशाकडून संरक्षित असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

आलेमाव यांनी सांगितले की, सरकारने मोटरसायकल पायलट सेवेला एक वैध व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे, शेकडा लोक या स्वरोजगारात आहेत. गोव्यातील मोटरसायकल पायलट्स, किंवा अन्य राज्यांतील बाईक टॅक्सिस, प्रवाशांसाठी कमी खर्चिक पर्याय राहिले आहेत, त्यामुळे या सेवेचा मोठा वापर केला जातो. गोव्यातील मोटरसायकल पायलटस त्यांच्या चांगल्या सेवेसाठी ओळखले जातात, असे ते म्हणाले.

Yuri Alemao motorcycle pilot goa
Goa Two Wheelers Pilot: मोटारसायकल पायलटसाठी विशेष योजना; सरकार देतंय परवाने, संधीचा लाभ घ्या

बाईक टॅक्सीसाठी स्पष्ट नियामक संरचनेच्या अभावामुळे न्यायालय या सेवेवर बंदी घालत आहे. ही बंदी हजारो लोकांचे जीवन आणि उपजीविकेवर नकारात्मक प्रभाव टाकते. यासाठी हा व्यवसाय सुरक्षीत ठेवणे आवश्यक आहे, असे आलेमाव यांनी सांगितले.

Yuri Alemao motorcycle pilot goa
Drone Pilot Course: गोव्याच्या ITI मध्ये यंदापासून ड्रोन पायलट अभ्यासक्रम, रोबोटिक्स कोर्सही लवकरच

विधानसभेत मुद्दा मांडणार

गोमंतकीय मोटारसायकल पायलट विश्वास आणि आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. त्यांची संख्या शेकडोंच्या घरात असून या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. त्यामुळे सरकारने हा प्रश्न अगोदरच हाताळला पाहिजे आणि न्यायालयाकडून प्रतिकूल हस्तक्षेप होऊ शकतो, अशी कमतरता भरून काढली पाहिजे, असे आलेमाव म्हणाले. येत्या विधानसभा अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित करणार असून पारंपरिक मोटारसायकल पायलटांची उपजीविका वाचविण्यासाठी सर्व आमदारांचा पाठिंबा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com