दरीत कोसळलेला कंटेनर  Dainik Gomantak
गोवा

मालपे महामार्गावर कंटेनर उलटला; चालक गंभीर जखमी

कंटेनर दरीत कोसळल्यानंतर चालक केबिन मध्ये अडकून पडल्याने तो मदतीसाठी ओरडत

दैनिक गोमन्तक

पेडणे: मालपे येथे काल रात्री(रविवारी 20 रोजी) 11 वाजता चालकाचा ताबा निसटल्याने मालवाहू कंटेनर (एम एच - वाय 4521) मालपे येथे सर्व्हिस रोड वरून मालपे उतरणीवर खोल दरीत कोसळला.या अपघातात अजय गिरी (वय 37) हा चालक गंभीर जखमी झाला.त्याला उपचारासाठी पेडणे सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सांगली येथून सदर कंटेनर पणजीच्या दिशेने जात होता. कंटेनर दरीत कोसळल्यानंतर चालक केबिन मध्ये अडकून पडल्याने तो मदतीसाठी ओरडत होता. ही माहिती घरी असलेले अग्नीशामक दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांना समजताच ते त्वरित घटनास्थळी गेले. त्यांनी आपल्या दलातील सहकाऱ्यांना बोलावून चालकास बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.

चालकाच्या पायाला जबर दुखापत झाली होती,त्याला केबिनमधून बाहेर काढले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून पेडणे सरकारी इस्पितळात दाखल केले. या अपघातात कंटेनरचा एक भाग तुटून रस्त्यावर तर दुसरा केबीनचा भाग दरीत जाऊन पडला. यावेळी रस्त्यावर दुसरे वाहन नसल्याने अनर्थ टळला.या मोहिमेत त्यांच्या सोबत स्थानिक सदानंद सवाळ देसाई(पेडणे क्रीडा अधिकारी ), सागर मळेवाडकर,नितेश माळवाडकर, अनिकेत नाईक, विनोद सावळ देसाई, दशरथ ,राजू किनळेकर , सहायक अधिकारी जयराम मळिक , हवालदार फटू नाईक, चालक प्रमोद गवंडी, जवान रतन परब, श्याम आरोंदेकर, यशवंत नाईक, केतन कामुलकर, मयूर नाईक यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Chimbel: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी; चिंबलवासीयांचा विरोधच

Goa Jail: कैद्यांच्या जेवणावर होणार 90 ऐवजी 123 रुपये खर्च! दरवाढ लागू; पोषणमान, महागाईचा विचार करून निर्णय

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

SCROLL FOR NEXT