Vasco News Dainik Gomantak
गोवा

Vasco News: सांकवाळ पंचायतघराचे बांधकाम लवकरच सुरु

गुदिन्हो ः झुआरीनगरात सार्वजनिक शौचालयांचे लोकार्पण

गोमन्तक डिजिटल टीम

सांकवाळ पंचायतघराच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. पंचायतघर हे सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज व राज्यातील सर्वात मोठे असेल, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. झुआरीनगर येथे जिल्हा पंचायत निधीतून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या उद्‍घाटनानंतर मंत्री गुदिन्हो बोलत होते. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वास, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, सांकवाळ उपसरपंच गिरिष पिल्ले व इतर मान्यवर उपस्थित होते.

सांकवाळ पंचायतघरासंबंधी काही सोपस्कार राहिले आहेत, ते पूर्ण झाल्यावर लगेच पंचायतघराची पायाभरणी करण्यात येईल. हे पंचायत घर राज्यातील एक आदर्श उदाहरण असेल. ज्याचे अनुकरण राज्यातील इतर पंचायती करू शकतात, असे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. पंचायत घर बांधण्यासाठी सरकारतर्फे सुमारे साडेतीन कोटी रुपये देण्यात येतील.

उर्वरित खर्च सांकवाळ पंचायत करणार आहे. या पंचायतघरामध्ये एक परिषद खोली, बैठक खोली, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग इत्यादीसाठी खोल्या असतील. यातून पंचायतीला महसूल मिळेल, असे ते म्हणाले.

जिल्हा पंचायत निधीतून ही सार्वजनिक शौचालये बांधण्यात आल्याबद्दल आमदार वास यांनी अनिता थोरात यांचे कौतुक केले. स्थानिकांची गैरसोय दूर होणार आहे. मात्र, त्यांनी सदर शौचालयाची योग्य ती देखभाल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

सरकार साडेतीन कोटी रुपये खर्च करणार असून पंचायत सुमारे दहा कोटी खर्च करणार आहे, असे उपसरपंच पिल्ले यांनी सांगितले. नवीन पंचायतघरासंबंधी काहीजणांनी निरनिराळ्या समस्या मांडल्या. येणाऱ्या काळात आम्ही या स्वप्नपूर्ती प्रकल्पाची पद्धतशीरपणे पायाभरणी करणार आहे. ग्रामस्थांनी कचराप्रश्‍न सोडविण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे. त्यांनी ओला व सुका असे वर्गीकरण केलेला कचरा दिल्यास कचरा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होईल, असे पिल्ले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT