Guleli panchayat Dainik Gomantak
गोवा

Sattari: गुळेली ग्रामपंचायतीचे बांधकाम रखडले; ग्रामस्‍थांना प्रतीक्षा

अडीच कोटींचा खर्च आता पोचलाय तब्‍बल साडेतीन कोटींवर

प्रेमानंद नाईक

गुळेली-सत्तरी येथील ग्रामपंचायतीची जुनी इमारत मोडून त्या जागी सुसज्ज नवीन इमारत बांधण्याचे काम सध्या रखडले आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, याची प्रतीक्षा स्‍थानिक करीत आहेत.

आरोग्‍यमंत्री तथा वाळपईचे आमदार विश्‍‍वजीत राणे यांनी हा प्रकल्‍प तातडीने मार्गी लावावा, अशी मागणीही करण्‍यात येत आहे.

गुळेली पंचायतीची इमारत जीर्ण झाली होती. या इमारतीत असलेल्‍या सभागृहाची जागा एखाद्या कार्यक्रमास कमी पडत होती. तसेच पावसाळ्यात अनेक ठिकाणी सभागृहात पाणी झिरपत होते.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन याच ठिकाणी ही इमारत पाडून सुमारे दोन कोटी रुपये खर्चून सुसज्ज इमारत उभारण्याचे काम सुरू झाले होते.

आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या प्रयत्नातून गोवा साधन सुविधा महामंडळातर्फे दीनदयाळ पंचायतराज इन्फ्रास्ट्रचर डेव्हलपमेंट (गोल्डन जुबली) योजनेअंतर्गत २४ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती.

पण त्‍यानंतर आलेल्या कोरोनाच्‍या लाटेमुळे या प्रकल्पाचे काम रखडले. सुरूवातीपासूनच ग्रहण लागलेल्‍या या इमारतीचे प्रत्यक्षात काम सुरू होण्यास २०२०चा जून महिना उजाडावा लागला.

पायाभरणी होऊन सतरा महिने उलटल्यानंतर जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले. नंतर सदर इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करून नवीन इमारत बांधण्याच्‍या कामाला प्रारंभ झाला. पण अजून हे काम पूर्ण झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT