Girish Chodankar: तरूण तेजपाल, मिलिंद नाईक प्रकरणात तक्रारी होत्या का?

चोडणकरांचा सवाल : मुख्यमंत्र्यांकडून होतोय सहकाऱ्याचा बचाव
Girish Chodankar
Girish Chodankar Dainik Gomantak
Published on
Updated on

तक्रारी आल्यास सरकार सेक्स स्कँडलची चौकशी करेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच सांगितले आहे. त्याचा संदर्भ घेत काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी माजी मंत्री मिलिंद नाईक आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती का, असा सवाल उपस्थित केला आहे.

Girish Chodankar
Goa Monsoon: राज्यात पुढील चार दिवस पावसाची विश्रांती

चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मंत्र्यांसह इतरांच्या वैयक्तिक आणि खासगी जीवनात हस्तक्षेप करू नका, असा सल्ला अलिकडेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जनतेला दिला आहे.

भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार तरुण तेजपाल यांच्या बाबतीत, पोलिसांनी दखल घेऊन त्यांना अटक केली होती, याची आठवण चोडणकर यांनी करून दिली.

भाजपच्या तथाकथित रामराज्यात ‘सत्तेचा’ वापर करून महिलांचे शोषण करणे ही संस्कृती आहे का, असा सवाल त्यांनी केला.

मागील मंत्रिमंडळातील सहकारी अशा प्रकरणात होता आणि दुसऱ्या एका मंत्र्याविरुद्ध खटला सुरू आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे, ही भाजपची आणि त्यांच्या सरकारची प्रमुख जबाबदारी मानत नाहीत नाही का? असा सवालही चोडणकर यांनी केला आहे.

Girish Chodankar
Fake Dentists: किनारी भागात काम करणाऱ्या तोतया दंतवैद्यांवर करणार कठोर कारवाई

मंत्री व राजकारण्यांकडून तसेच उच्चपदस्थांकडून होणाऱ्या लैंगिक मागण्या नाकारण्यासाठी वा प्रतिकारासाठी राज्य सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. नुकत्याच झालेल्या सेक्स स्कँडलचा पोलिस अहवाल मागवावा आणि प्राथमिक अहवालाच्या आधारे संबंधित मंत्र्याला बडतर्फ करावे,असेही चोडणकर पत्रकात नमूद केले आहे.

चोडणकर पुढे असेही म्हणतात,की एकदा का आपण संबंधित मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळले की त्यानंतर कोणीच त्यांच्या वैयक्तिक आणि खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. याबाबत आपण वचन देतो, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.

गेल्या ७ वर्षांत ३,८१९ प्रकरणांची नोंद

अनेक मंत्री अशा अनैतिक कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत आणि असहाय सामान्य लोकांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करण्यास जबाबदार असल्याचा आरोपही गिरीश चोडणकर यांनी केला आहे. महिलांबांबत सरासरी दररोज किमान एक गुन्हा नोंदवला जातो. गेल्या सात वर्षांत राज्यात अशा ३ हजार ८१९ प्रकरणांची नोंद झाली आहे. आपण महिलांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. पीडितांचा सार्वजनिकरित्या अपमान होऊ देऊ नये,असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने वागावे !

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे. सावंत यांनी ज्या तत्त्वाच्या आधारे एका पोलिस अधिकाऱ्यावर एका महिलेच्या विनयभंगाबाबत तात्काळ कारवाई केली, त्याच तत्त्वावर या मंत्र्यावरही कारवाई करावी आणि त्याला बडतर्फ करावे, अशी मागणीही गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com