वास्को : मुरगाव नगरपालिकेने भाजपचे आमदार कृष्णा साळकर, नगरसेवक शमी साळकर,लिओ रोड्रिक्स व इतर संबंधित अधिकार्यांसमवेत वास्को पोलिसांच्या उपस्थितीत वास्को मासळी मार्केटची जुनी शेड काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उद्या गुरुवारी मासळी मार्केटमधील विक्रेत्यांचे तात्पुरते स्थलांतर अपेक्षित असून नवीन मार्केट प्रकल्पाला चालना मिळणार आहे.
(Construction of a new fish market in Vasco will begin soon)
वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी आज बुधवारी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन मासळी बाजार प्रकल्पाच्या पुनर्बांधणीचे काम चालू करण्यासाठी सध्याच्या मासळी बाजाराचे पत्रे काढण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले. तर गुरुवारपासून मार्केट पाडण्याचे काम सुरू होईल. तसेच देव दामोदर ट्रस्टच्या नवीन मासळी बाजार प्रकल्पाची प्रस्तावित पुनर्बांधणी 18 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे असे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. मार्केट उभे रहावे म्हणून मुरगाव नगरपालिका अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. अनेक अडथळे दूर करून सुडामार्फत लवकरच नवीन मासळी मार्केट बांधण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.
पालिका मंडळाला 14 व्या वित्त आयोगातर्फे देण्यात आलेले 23 कोटी रुपयांचा निधी वापरण्यात येईल. नवीन मासळी मार्केटचा पायाभरणी सोहळा संपन्न होऊन कामाला सुरुवात होणार आहे. मुरगाव नगरपालिकेने 23 कोटी रुपये राज्य नगरविकास संस्था (सुडा) कडे सुपूर्द केले आहेत.
मुरगाव नगरपालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, आमदार कृष्णा साळकर व वास्को मासळी व्यावसायिकांमध्ये झालेल्या बैठकीत तात्पुरत्या मासळी मार्केटमध्ये बसण्याचा निर्णय मासळी घेतला होता.त्यानूसार पूर्वीच्या मासळी मार्केटमधील सर्व मासे विक्रेत्यांबरोबर तेथे बसणारे फळ, भाजी विक्रेते आपला व्यवसाय वास्को येथील देव दामोदर ट्रस्टमध्ये सुरू करणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.