Curmona Village CRZ  Dainik Gomantak
गोवा

CRZ Goa: पर्यावरणमंत्र्यांच्‍याच जागेत ‘सीआरझेड’चे उल्‍लंघन करून बांधकाम; करमणेतील स्‍थानिकांचा दावा

Curmona Village: बांधकामाची सखोल चौकशी करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यावरणमंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांच्‍या मालकीच्‍या करमणे येथील साळ नदीजवळ जे बांधकाम आहे ते पूर्णत: बेकायदेशीर असून सीआरझेड कायद्याचे उल्‍लंघन करून हे बांधकाम उभारले जात आहे, असा आरोप स्‍थानिकांनी केला आहे. सीआरझेड प्राधिकरणाने या बांधकामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही केली.

यापूर्वी या बांधकामाबद्दल समाजमाध्‍यमावर एक व्‍हिडिओ प्रसारित झाला होता. त्‍यानंतर करमणे पंचायतीकडे रेनबो वॉरियर्स या पर्यावरणप्रेमी संघटनेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन मंगळवारी स्‍थानिक पंचायतीने या कामाची पाहणी ठेवली होती. मात्र, या पहाणीच्‍यावेळी ‘सीआरझेड’ प्राधिकरणाचे प्रतिनिधी हजर नव्‍हते.

व्हेन्झी व्हिएगस, आमदार

आम्‍ही जमीनमालकाकडे चाैकशी केली असता, हे बांधकाम पाटबंधारे खात्‍याने हातात घेतले आहे, असे सांगण्‍यात आले. मात्र, खासगी जागेत पाटबंधारे खाते हे काम कसे करते आणि हे काम करण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे कुणी अर्ज केला याची कुठलीही माहिती आम्‍हाला देण्‍यात आली नाही. यावेळी सीआरझेड प्राधिकरणाचे अधिकारीही गैरहजर राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT