Mormugao Port Authority Dainik Gomantak
गोवा

Goa NCP: मासळी व्यावसायिकांच्या जहाजासाठी सुसज्ज जेटी बांधा; राष्ट्रवादीची एमपीएकडे मागणी

मासळी व्यवसायिकांकडे 70 टक्के लाकडी जहाजे तर 30 टक्के लोखंडी जहाजे आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao Port Authority: गोवा राष्ट्रवादी काँग्रेस (Goa NCP) प्रदेशाध्यक्ष तथा अखिल गोवा मच्छिमार जहाज मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी मुरगाव पत्तन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वास्कोतील मासळी व्यवसायिक व खारीवाडा जेटी विषयी समस्या मांडल्या.

अखिल गोवा मच्छिमार जहाज मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी मुरगाव पत्तन प्राधिकरणचे (MPA) अध्यक्ष डॉ. एन विनोदकुमार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्याच्या समवेत संघटनेचे खजिनदार झेवियर डिसोझा, सहखजिनदार अबुबेकर डांगी, सहकारी संस्थेचे व्यवस्थापक रोहीत.एस उपस्थित होते. याप्रसंगी जुझे फिलीप डिसोझा यांनी एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन विनोदकुमार यांच्या कडे वास्को खारीवाडा समुद्र किनाऱ्यावरील जेटी विषयावर बोलणी केली.

एमपीएने मासळी व्यावसायिकांच्या जहाजासाठी लवकरच सर्व साधन सुविधाने उपलब्ध जेटी बांधून देण्याची मागणी केली. मासळी व्यवसायिकांकडे 70 टक्के लाकडी जहाजे तर 30 टक्के लोखंडी जहाजे आहेत. व्यवसायिकांसाठी योग्य असा धक्का नसल्याने समुद्रात नागरून ठेवावे लागतात.

यासाठी एमपीएने मासळी बांधवाच्या भल्यासाठी जेटी बांधून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डिसोझा यांनी केली. एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन विनोदकुमार यांनी याविषयी चर्चा करून, मासळी बांधवांना सहकार्य करण्यासह जेटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...म्हणून गोवा सोडलं', आयोजकांनी पहिल्यांदाच सांगितलं IBW हलवण्याचं कारण; नेमका गोंधळ काय?

रानडुक्कर समजून झाडलेली गोळी मित्राला लागली; सावंतवाडीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Opinion: भारताला उंच पुतळ्यांत नव्हे, तर एकेकाळी जगाला आपल्याकडे आदराने व कुतूहलाने पाहायला लावणाऱ्या गूढतेत शोधणे आवश्यक आहे..

Goa Live News: धारगळमधून श्रीकृष्ण हरमलकर, तर तोरसेतून राघोबा कांबळी यांचा अर्ज दाखल; देवी भगवतीचे घेतले आशीर्वाद

Ind Vs SA: भारत आफ्रिका सामन्यापूर्वी मोठी बातमी! 2 खेळाडू दुखापतग्रस्त; 'वॉशिंग्टन'लाही डच्चू? पंत, तिलकवरती नजर

SCROLL FOR NEXT