Goa Loksabha
Goa Loksabha 
गोवा

Goa Loksabha: संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य! काँग्रेसच्या विरियातोंची उमेदवारी बाद करण्याची भाजपची मागणी

Pramod Yadav

Goa Loksabha Election 2024

भारतीय संविधान गोमन्तकीयांवर लादण्यात आल्याचे वक्तव्य काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केल्याने, गोव्यात वांदग झाला. यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरियातो यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे अशी मागणी त्यांनी केलीय.

याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. विरियातो यांनी संविधानाचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.

भाजपचे आमदार दिगंबर कामत, दामू नाईक आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरियातो यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच, विरियातो यांनी भारतीय संविधानाचा अपमान केल्याचा आरोप नाईक यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

विरियातो यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र करावे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

दुहेरी नागरिकत्वाचे समर्थक असणारे विरियातो फर्नांडिस यांनी राहुल गांधी यांना 2019 मध्ये हा विषय समजावून सांगताना गोव्यात संविधान लादल्याची फर्नांडिस म्हणाले.

विरियातो यांच्या वक्तव्यावरुन सध्या राज्यात वांदग निर्माण झाला असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेस लोकशाहीला धोका असल्याचे मत मांडले. तसेच, काँग्रेसमुळेच गोव्याला 14 वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले असा आरोप केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या वक्तव्याची दखल घेतली असून, विरियोतोंचे वक्तव्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान असल्याची टीका पंतप्रधान मोदींना छत्तीसगड येथील प्रचारसभेत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT