माविन गुदीन्हो Dainik Gomantak
गोवा

गोवा वीजघोटाळा प्रकरणी गुदिन्‍हो यांना दिलासा

सुनावणीस अनुपस्‍थित राहण्‍याची मुभा

दैनिक गोमन्तक

मडगाव: डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात सध्या मंत्री असलेले माजी वीजमंत्री माविन गुदिन्हो यांना 4.52 कोटी रुपयांच्‍या वीजघोटाळा प्रकरणाच्या सुनावणीस अनुपस्‍थित राहण्याची मुभा आज दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने दिली. त्‍यामुळे त्‍यांना थोडा दिलासा मिळाला आहे. सदर सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्या न्यायालयात सुरू आहे. गुदिन्हो यांच्या वतीने आज सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी मागितली होती. आता पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे.

1998 साली वीजमंत्री असताना गुदिन्हो यांनी काही कंपन्यांना बेकायदेशीरपणे वीजबिलांत माफी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मंत्र्यांबरोबर त्यावेळचे मुख्य वीज अभियंते, दोन कंपन्या आणि अन्य चार जणांवर फसवणूक करणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रकार उघडकीस आणून या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर 24 वर्षांनी ही सुनावणी सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

SCROLL FOR NEXT