Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: शिवोलीत कॉंग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियान

सध्या राज्यात गाजत असलेल्या म्हादई प्रश्नावरून भाजपसरकार जनतेची दिशाभूल करत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

भाजप सरकारने आतापर्यंत महागाईचा उच्चांक गाठला असून देशभरातील सामान्यांचे त्यामुळे कंबरडे मोडले आहे. विकासकामे, रोजगाराबाबत जनतेला केवळ पोकळ आश्वासनेच देण्यात आली आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी रविवारी शिवोलीत केला.

कॉंग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ अभियानाची शिवोली बाजार येथून सुरुवात केल्यानंतर पाटकर बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष बीना नाईक, शिवोली गट कॉंग्रेसच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर, माजी गटाध्यक्ष राजेश कोचरेकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, युवा अध्यक्ष ॲड. रोशन चोडणकर, माजी मंत्री ॲड. चंद्रकांत चोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवोली गटाध्यक्ष पार्वती नागवेकर यांनी सांगितले,की सध्या राज्यात गाजत असलेल्या म्हादई प्रश्नावरून भाजपसरकार जनतेची दिशाभूल करत आहे. यावेळी,ज्येष्ठ नेते ॲड. चंद्रकांत चोडणकर , विजय भिके आदींची भाषणे झाली. ‘हात से हात जोडो’ अभियानांतर्गत कॉंग्रेसच्या नेत्यांनी यावेळी बाजारकरांशी संपर्क साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर! प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची चिन्हे; 4 मे रोजी होणार मतमोजणी

Horoscope: 'या' राशींना होणार धनप्राप्ती! ग्रह देताहेत शुभसंकेत; कुणाला होणार फायदा? वाचा राशिभविष्य

LPG Gas Cylnder: गोव्यात भीतीमुळे गॅसचे झपाट्याने 'बुकिंग'! एका दिवसात तब्बल 'इतक्या' सिलिंडरचे वितरण; किती साठा आहे शिल्लक? वाचा..

Dhurandhar 2: "यासाठी धुरंधरमधला रोल सोडला"! प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा; बॉलिवूडमध्ये रंगली जोरदार चर्चा

Kanagi: ‘गोंयकार’ गृहिणी तव्यावर लोणी सोडून मग डोळे बंद करून भाजीच्या टोपलीत हात घालतात; 'कणगी'महात्म्य

SCROLL FOR NEXT