Ramakant Khalap Dainik Gomantak
गोवा

'मांद्रे मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेत्यांचा मान राखावा'

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदारसंघातील (Mandre constituency) राजकारणात जसे भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी एका पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे कॉंग्रेस (Congress) पक्षात युवकांचा सामना जेष्ठ राजकारणी नेत्याना करावा लागत आहे. युवकांच्या उत्साहातून जेष्ठ राजकारणी नेत्यांचा अपमान करण्यापेक्षा युवकांनी त्याचे आशीर्वाद घेवून, त्यांना सोबत घेवून व त्यांच्या अनुभवाचा वापर करून राजकारण (Politics) करावे. असा सूर आता खुद्द कॉंग्रेस पक्षाच्या जेष्ठ  कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे. शिवाय जेष्ठ राजकर्त्ये नाराज होणार नाही यांचेही भान ठेवावे अशी मागणी केली जात आहे.

नुकतीच कॉंग्रेस पक्षाचे मतदार संघातून उमेदवारांची नावे सुचवण्यासाठी बैठक मांद्रे येथे झाली. या बैठकीत युवा नेते सचिन परब यांचे समर्थक मोठ्या संखेने उपस्थित होते, साहजिकच मग हे उत्साही युवा कार्यकर्त्यांनी सचिन सचिन असा नारा देवून एकमुखी मागणी उमेदवारी सचिन परब यांनाच द्यावी अशी जोरदार केली. तर उपस्थित युवा कार्यकर्त्यांनी जेष्ठ राजकारणी माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांच्या नावाची शिफारस केली गेली त्यावेळी काहींनी तर वय झालेल्यांनी उमेदवारी मागू नये आणि वेगळे शब्द वापरले, बाबी बागकर आणि जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर यांच्याही नावाची शिफारस करण्यात आली. लोकशाहीत कुणीही कुणाचे नाव सुचवू शकतात, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यावेळी मात्र सर्व इच्छुकांनी एकत्रित होवून विजयासाठी झटावे लागणार आहे.

खलप यांचा त्याग लक्षात घ्यावा

मांद्रे मतदार संघातून तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले रमाकांत खलप हे जेष्ठ राजकारणी आहे, मगोच्या त्याग करताना त्यांनी भाजपा कॉंग्रेस असा प्रवेश केला. मगोतून त्यांनी त्याग केल्यानंतर त्याना राजकीय मोठा तोटा झाला. आज ते मगोत असते तर आजही आमदार मंत्री झाले असते. मागच्या विस वर्षापासून राजकीय वनवासात ते आहेत त्याचा अर्थ ते जेष्ठ जाणकार राजकारणी आहे, त्याचा आजच्या युवकांनी लाभ घ्यायला शिकले पाहिजे. त्यांच्या त्यागाची कॉंग्रेस युवा कार्यकर्त्यांनी जाण ठेवून वागायला हवे. लोकशाहीत कुणीही कुणासाठी उमेदवारी मागू शकतो मग तो युवक असले किंवा जाणकार, निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगाने वयाची मर्यादा अंतिम घातलेली नाही. मागच्या दोन दिवसापूर्वी उमेदवारांची नावे सुचवताना केंद्रात स्वतंत्र कायदा मंत्री म्हणून यशस्वी भार सांभाळला त्यांच्या कार्याची व्याप्ती मोठी आहे आजही त्याचे केंद्रात सर्व पक्षांकडे चांगले संबध आहेत त्यांनी ठरवले तर ते सहज कॉंग्रेसची जशी 2019 च्या पोट निवडणुकीत उमेदवारी आणली होती तशी ते 2022 च्या निवडणुकीतही आणू शकतात.

माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बन बँक उच्च पदावर पोचवली होती, सरकारने ठरवले असते तर ती बँक आजही यशस्वीपणे कार्यरत झाली असती, मात्र बँकच्या विरोधकांनी यात पूर्ण पणे राजकारण घुसवून खालपा यांच्या माथी रोष ठेवून जे जे बँक कर्मचारी होते त्याना घरी पाठवण्याचे एक पाप सरकारने आपल्या हाती घेतलेले आहे. बँक विषयी अनेकांनी खलप याना दोष देवून मोकळे झाले मात्र सत्य परिस्थिती कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खलप यांचे शिक्षणात योगदान

खलप यांनी मतदार संघातील आणि परिसरातील घर बसल्या उच्च दर्ज्याचे शिक्षण मिळावे यासाठी विकास परीशध मार्फत शिक्षण संस्था प्राथमिक, माध्यमिक उच्च व डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण मांद्रे कॉलेज मध्ये मिळते त्या कॉलेज किंवा हायस्कूलमध्ये खलप यांचे कुणीच नातेवाईक शिक्षक किंवा कर्मचारी म्हणून कामाला ठेवलेले नाही हि खासियत आहे. आणि त्यानी शिक्षण संस्थेत कधीच राजकारण आणले नाही, किंवा ठरावीक पक्षाचेचे समर्थक असलेले शिक्षक म्हणूनही कामाला लावले नाहीत.

आज पर्यंत खलप यांनी त्याग केला त्याचे भान मांद्रे मतदार संघातील आताच्या कॉंग्रेस युवा कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे, केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही, अश्या प्रकारातून कॉंग्रेस पक्षाचे विभाजन गट बाजी होते आणि त्याचा विरोधक लाभ उठवत असतात.

कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी जरी कुणालाही मिळाली तरीही जे तीन इतर इच्छुक आहेत ते एकत्रित येईल याची ग्वाही कोण देणार, समजा दोन युवकांमध्ये जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर, सचिन परब यांच्या पैकी एकाला उमेदवारी मिळाली तरी जेष्ठ नेते त्यांच्यासोबत असतील आणि जेष्ठा पैकी बाबी बागकर किंवा रमाकांत खलप याना उमेदवारी मिळाली तर युवा नेते या जेष्ठा सोबत असतील काय हाही प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. मांद्रे मतदार संघातून युवक उत्साहित आहेत कि यंदा युवकाला उमेदवारी मिळेल. पण उमेदवारी मागताना युवक उमेदवारांच्या समर्थकांनीही अतिउत्साहात जाणकार नेत्यांचा अवमान या पुढे होणार नाही यांचे भान ठेवावे अशी मागणी जेष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्यांन भान ठेवावे अशी जेष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT