'प्रसाद गावकरांनी स्वतःला राजकिय सौदेबाजीतील वस्तू बनवले': राखी नाईक

असा आमदार मिळणे हे सांगेकरांचे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्या राखी नाईक (Rakhi Naik) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Rakhi Naik
Rakhi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: प्रत्येक पक्षात उडी मारण्यास तयार असलेले सांगेचे आमदार प्रसाद गावकर (Prasad Gavkar) यांनी राजकिय सौदेबाजीत आपण विकला जायला तयार असलेली वस्तू हे स्पष्ट केले आहे. असा आमदार मिळणे हे सांगेकरांचे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्या राखी नाईक (Rakhi Naik) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या बरोबर प्रसाद गावकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. गावकर याना सांगेची काँग्रेस उमेदवारी मिळण्याचे संकेत असून या पार्श्वभूमीवर नाईक यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. सांगेतून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून 14 जणांची नावे गेली आहेत त्यात नाईक यांचेही नाव आहे. सांगेतील इतर काँग्रेस कार्यकर्त्यानीही गावकर याना काँग्रेस उमेदवारी देण्यास विरोध केला आहे.

Rakhi Naik
तुळसीदास गावस मुळे भाजपची ताकत वाढली अन्यथा...

नाईक यांनी या पत्रकात, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाकडे भाजपशी दोन हात करण्याची क्षमता नाही असे वक्तव्य करत गावकर यांनी आपला पाठिंबा तृणमुल काँग्रेसला दिला होता अशा परिस्थितीत आता त्यांनी अकस्मात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट कशी घेतली असा सवाल करीत. अशा अस्थिर आमदाराला सांगेची जनता कधीही समर्थन देणार नाही असे नाईक यांनी म्हटले आहे.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्या जीवावर गावकर उड्या मारत आहेत असा आरोप करत मागच्या पाच वर्षात गावकर यांनी सांगेत काय विकास केला हे सरदेसाई यांनी सांगेत येऊन स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Rakhi Naik
...अखेर आप नेते अमित पालेकर यांनी आमरण उपोषण सोडले

दरम्यान सांगेचे अन्य एक काँग्रेस कार्यकर्ते संदेश कोसंबे यांनी प्रसाद गावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध करताना राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत त्यांना घेऊन दिल्लीला गेले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. कामत याना गावकर याना दिल्लीत न्यायचेच होते तर 2017 मध्ये नेऊन काँग्रेस सरकार स्थापन करायला हवे होते असे ते म्हणाले. आम्ही 14 जणांची नावे दिली आहेत त्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तर आम्ही त्याच्यासाठी काम करू मात्र गावकर याना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांना कदापिही स्वीकारणार नाही असे ते म्हणाले. युवा काँग्रेसचे सांगे गट अध्यक्ष जार्वीस फेर्नांडिस यांनीही गावकर याना काँग्रेसची उमेदवारी देण्यास विरोध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com