Congress PC

 

Dainik Gomantak

गोवा

'केपे काँग्रेसचा बालेकिल्ला आणि काँग्रेसच तो सर करणार'

बाबू कवळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन मोठी चूक केल्याचा निशाणाही आमोणकर यांनी साधलाय.

दैनिक गोमन्तक

केपे : बाबू कवळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन सर्वात मोठी चूक केली आहे, हे त्यांना आता कळून चुकले असेल. केपे हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून परत एकदा हा मतदारसंघ काँग्रेसच काबीज करणार हे भाजपने ध्यानात ठेवावे, असा इशारा काँग्रेसचे केपे गट अध्यक्ष अवधूत आमोणकर यांनी दिला.

केपेत दोन दिवसांपूर्वी भाजपची जाहीर सभा झाली होती. त्या सभेत भाजपचे (BJP) प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी एल्टन डिकॉस्ता कोण असा सवाल केला होता. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आमोणकर यांनी आज पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. सदानंद शेट तानावडे यांच्याकडे मोठे पद असूनसुद्धा जर एल्टन डिकॉस्टा यांच्या राजकीय प्रवासाची माहिती नसेल तर हे त्यांचे दुर्दैव असल्याचे आमोणकर म्हणाले.

एल्टन डिकॉस्टा हे राजकीय क्षेत्रात नवीन नसून तर त्यांचा राजकीय प्रवास केपेचे आमदार बाबू कवळेकर यांच्यापुर्वी सुरू होता, असे आमोणकर यांनी सांगितले. 1994 साली ते फातर्पा पंचायतीमध्ये सरपंच पदावर होते. त्यानंतर कवळेकर हे जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते, यावरुन राजकीय प्रवास कुणाचा पहिल्यांदा सुरु झाला याची माहिती तानावडे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी करुन दिली नसावी असे आमोणकर यांनी सांगितले.

भाजपच्या मंत्र्यानेच नोकर भरतीत घोटाळा झाल्याचे उघड केले आहे. त्यांचा एक मंत्री सेक्स स्कॅडल मध्ये गुंतला असून आता त्यांनी काँग्रेसवर (Congress) टीका करण्याऐवजी अशा मंत्र्यांवर कारवाई करुन लोकांना न्याय देण्याचे काम करून दाखवावे, असे आमोणकर यांनी सांगितले. केपेत भर बाजारात जाहीर सभा घेऊन सामान्य लोकांना त्रास देण्याचा त्यांना कोणताच अधिकार नव्हता. त्यांनी ही सभा कोणत्याही सभागृहात घ्यायला पाहिजे होती असेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs OMA: 31 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारतीय फुटबॉल संघाचा ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच ओमानला नमवून पटकावले कांस्यपदक

Supreme Court: शिक्षा पूर्ण होऊनही 4.7 वर्षे अधिक तुरुंगात, सुप्रीम कोर्टाचा संताप; पीडिताला 25 लाखांची भरपाई देण्याचे सरकारला आदेश

Weekly Horoscope: नशिबाचा तारा उजळणार: 'या' 4 राशींना पैसा, यश आणि मान-सन्मान लाभणार

SUV खरेदीदारांसाठी खुशखबर! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महिंद्रा, टाटा आणि टोयोटाच्या गाड्या तब्बल 3.5 लाखांनी स्वस्त

Sanguem Lottery Winner: गणपती बाप्पा पावला...! सांगे गणेश मंडळाच्या लॉटरीत होमगार्ड महिलेला जॅकपॉट; 2 BHK फ्लॅटसह 35 लाखांची लागली लॉटरी

SCROLL FOR NEXT