Agnelo Fernandes Dainik Gomantak
गोवा

लोबोंना कॉग्रेस प्रवेश दिल्यास काम करणार नाही: आग्नेलो फर्नांडिस

कळंगुटचे माजी आमदार तथा वरिष्ठ कॉग्रेस नेते आग्नेलो फर्नांडिस (Agnelo Fernandes) यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

दैनिक गोमन्तक

पक्षांतरे ही प्रत्येक पक्षात होत असतात, पश्चिम बंगालच्या (West Bengal) मागील निवडणुकापुर्वी तुण्रुमूल पक्षाचे (Trinamool Congress) अनेक नेते पक्ष सोडून अन्य पक्षात गेले होते. पूर्वाश्रमीचे कॉग्रेस नेते लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी केलेले पक्षांतर यालाही कांही कारणे असतील काहीजण स्वाभीमान प्राप्त करण्यासाठी तर कांही लोक स्वार्थासाठी पक्षांतरे करत असतात त्याला कॉंग्रेस पक्षही अपवाद नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन कळंगुटचे माजी आमदार तथा वरिष्ठ कॉग्रेस नेते आग्नेलो फर्नांडिस (Agnelo Fernandes) यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

लुईझिन फालेरो कॉंग्रेसमुळेच मोठे झाले त्यांना प्रदेशाध्यक्षपदही बहाल करण्यात आले होते  परंतु त्यांनीच ते नाकारले व पक्षांतर केले त्यामुळे या गोष्टीला पक्ष जबाबदार नसल्याचे फर्नांडिस यांनी एका प्रश्नांवर सांगितले. दरम्यान, आपली दिल्ली भेट ही पक्षाच्या वर्तमान परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी होती यावेळी अन्य कुठल्याही मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. कळंगुटचे माजी सरपंच एन्थॉनी मिनेझीस यांचा कॉग्रेस प्रवेश स्वागतार्ह आहे पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिल्यास आपण एक सच्चा कॉगेसमन या नात्याने त्यांच्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही फर्नांडिस यांनी यावेळी दिली मात्र विद्यमान आमदार मायकल लोबो यांना दिल्लिस्थित वरिष्ठांकडून कॉग्रेस प्रवेश दिल्यास आपण त्यांच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत काम करणार नाही परंतु पक्षत्याग मात्र करणार असल्याच्या गोष्टीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

दरम्यान,  मायकल लोबो यांचामुळेच आज कळंगुट संपलेला आहे, डोंगर संपलेले आहेत, परप्रांतीय लोकांच्या वस्त्या वाढलेल्या आहेत,  बेकायदा प्रकल्प उभे राहात आहेत अशा व्यक्तीसाठी मुळ कळंगुटकर मतदान करणार नसल्याचा निर्वाळा देतांनाच जेथे मतदार नाहीत अशा व्यक्तीसाठी आपण निश्चितच काम करणार नसल्याचे फर्नांडिस यांनी शेवटी निक्षून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT