पणजी: राज्यातील काँग्रेसमध्ये बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. बेशिस्त वागणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी बेशिस्त वागणाऱ्या नेत्यांना दिली आहे. त्याशिवाय ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी खुशाल सोडावा. त्यांच्या जीवावर पक्ष चालत नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
गोवा महिला काँग्रेसच्या प्रतीक्षा खलप यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार कार्लोस फेरेरा, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष बिना नाईक आणि इतर पदाधिकारी व नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
माजी प्रदेशाध्यक्ष बीना नाईक यांनी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा भार प्रतिक्षा खलप यांच्याकडे सुपूर्द केला.
पाटकर म्हणाले, नव्याने नियुक्त महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिक्षा खलप या पंधरा दिवसांत पायउतार होणार असल्याची अफवा काहीजण पसरवत असल्याचे आढळून आले आहे. पक्षाची बदनामी करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्यांची नावे कळवावीत, ती नावे गुप्त ठेवली जातील.
महिला काँग्रेस सरकारला जाब विचारणार
महिलांसाठी डबल इंजिन नाही, तर ते ट्रबल सरकार बनलेले आहे. गोव्यात गँग रेप होतात, महिलांचा विनयभंग होण्याच्या घटना घडतात. राज्य महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही, हे राज्य सरकारसाठी निंदनीय आहे.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात अशा घटना घडत असतील, तर देशाची प्रतिमा काय बनेल. राज्य सरकारविरोधात प्रदेश महिला काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि जाब विचारेल, असे अलका लांबा यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.