Girish Chodankar on MLA Disqualification Petition Dainik Gomantak
गोवा

आमदार अपात्रता याचिकेवरील निर्णयाला काँग्रेस आव्हान देणार

'त्या' आमदारांना गोव्यातील जनता नाकारेल, गिरीश चोडणकरांना विश्वास

आदित्य जोशी

पणजी : आमदार अपात्रता याचिकेवरील निर्णयाला काँग्रेस सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोर्टाने आमदार अपात्रता याचिका फेटाळली असली तरीही लोकांच्या कोर्टात आम्हाला न्याय मिळणार. पक्षांतर करणाऱ्या त्या आमदारांना गोव्यातील जनता नाकारेल असा विश्वास गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला आहे. (MLA Disqualification Petition News Updates)

विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) यावेळी दिलेल्या उमेदवारांवर काँग्रेसचा पूर्ण विश्वास आहे. ज्याप्रमाणे पक्षांतर करणारे आमदार होते, त्यांच्यावर लोकांचा रोष आहे. जनता गप्प बसणार नाही. राजकीय पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच लोकशाहीच्या मूल्यांचा प्रश्नही उपस्थित झाला आहे, असंही चोडणकर पुढे म्हणाले आहेत.

आमदार अपात्रता याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकरांनी गोमन्तकला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या निर्णयावर स्पष्टपणे भाष्य करणं सुदिन ढवळीकर यांनी टाळलं आहे. तसंच वरच्या कोर्टात या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र याचा अंतिम निर्णय पक्षाची कार्यकारिणी समितीच्या बैठकीत घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान निवडून आल्यानंतर कोणत्याही आमदाराने एकट्याने किंवा समूह करुन राजीनामा देत पक्षांतर केल्यास त्याच्यावर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

12 आमदारांविरोधात काँग्रेस (Congress) आणि मगो पक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर आज सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निवाडा देताना ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्या बाराही आमदारांना अपात्रता पासून दिलासा मिळाला आहे. मगोने पुढील कोर्टात दाद मागण्याबाबत कोणताही विचार केला नसला तरी काँग्रेस मात्र या निर्णयाविरोधात दाद मागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT