Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "भाजप सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे"! LOP युरींचा हल्लाबोल; विरोधी आमदारांची घेणार बैठक

Goa Congress: आलेमाव म्हणाले, तीन मोफत एलपीजी सिलिंडर कुठे आहेत? बेरोजगारी भत्ता कुठे आहे? मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेले एकही आश्वासन भाजप सरकार पूर्ण करू शकलेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सर्व विरोधी आमदारांची बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉँग्रेस बोलवणार आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता होते. या बैठकीत राज्यासमोर उभ्या असलेल्या विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून येत्या विधानसभेच्या अधिवेशनात हे मुद्दे प्रभावीपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आलेमाव यांनी भाजप सरकारवर तीव्र टीका करत, “भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून राज्याची प्रतिमादेखील जपण्यात सरकार कुचकामी ठरले आहे,” असा आरोप केला.

“आज गोव्यात नाईट क्लबमध्ये मृत्यू, अमली पदार्थांचा वाढता पुरवठा, अपघातांमुळे होणारे बळी आणि पर्यावरणाची होत असलेली नासधूस हे चित्र दिसून येत आहे. या सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. येत्या अधिवेशनात आम्ही जनतेचा आवाज विधानसभेत बुलंद करू आणि सरकारच्या अपयशांना जबाबदार धरणार आहोत,” असे आलेमाव म्हणाले.

आलेमाव म्हणाले, तीन मोफत एलपीजी सिलिंडर कुठे आहेत? बेरोजगारी भत्ता कुठे आहे? मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेले एकही आश्वासन भाजप सरकार पूर्ण करू शकलेले नाही,” अशी टीका त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT