Congress Zilla Panchayat Llist Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ''भाजपने यादी जाहीर केल्यावरच आम्ही उमेदवार देऊ!'', ZP Electionसाठी पाटकरांचा 'वेट ॲण्ड वॉच'चा फॉर्म्युला

Goa Zilla Panchayat election: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मोठी खेळी खेळली आहे

Akshata Chhatre

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मोठी खेळी खेळली आहे. भाजपची उमेदवारांची यादी जाहीर झाल्याशिवाय काँग्रेस आपले उमेदवार घोषित करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पाटकर यांनी घेतली आहे. भाजपची खोडा घालणे किंवा शेवटच्या क्षणी रणनीती बदलणे हीच सवय असल्याने हे टाळण्यासाठी ही रणनीती अवलंबण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या लक्ष्यभेदी हल्ल्यांना टाळण्यासाठी रणनीती

अमित पाटकर यांनी भाजपवर टीका करताना काँग्रेसच्या या भूमिकेमागील कारण स्पष्ट केले. पाटकर म्हणाले, "आमचे मुख्य उद्दिष्ट भाजपचा पराभव करणे हे आहे. जर आम्ही आमची यादी लवकर जाहीर केली, तर काँग्रेसच्या उमेदवारांची नवी जाहीर होतील आणि भाजप लगेचच आमच्या उमेदवारांना लक्ष्य करण्यास सुरुवात करेल."

मात्र काँग्रेसने आपल्या इच्छुकांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनौपचारिकरित्या बूथ स्तरावर काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपला विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची भीती वाटत असल्यानेच ते आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब करत आहेत, असा आरोपही पाटकर यांनी केला.

विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न; आज महत्त्वपूर्ण बैठक

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती केली होती. याच धर्तीवर आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीतही भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत.

माध्यमांशी बोलताना पाटकर यांनी माहिती दिली की, "राज्यातील सर्व विरोधी पक्षांच्या अध्यक्षांची आज सायंकाळी भेट होणार आहे. या बैठकीत संभाव्य युती आणि भाजपविरोधात एकत्र लढण्याची रणनीती निश्चित केली जाईल." गोव्याच्या हितासाठी आणि भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांचे एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत पाटकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

विकेट पडताच टीव्ही बंद करायचे, 'या' महान भारतीय क्रिकेटपटूला मुलगा मानायचे, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'ती' खास पोस्ट चर्चेत!

ना सनी, ना बॉबी... दिवंगत धर्मेंद्र यांनी बायोपिकसाठी 'या' सुपरस्टारला दिली होती पसंती; म्हणाले होते, "तो खरा सच्चा माणूस''

Goa Tourism: गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनाचा श्रीगणेशा! 'सेलिब्रिटी मिलेनियम'मधून 2000 प्रवासी दाखल

SCROLL FOR NEXT