IFB Workers Protest in Verna Dainik Gomantak
गोवा

IFB Workers Protest in Verna : आयएफबीच्या 'त्या' 130 कर्मचार्‍यांकडे असंवेदनशील भाजप सरकारचं दुर्लक्ष

कामावरून कमी केलेल्या 130 कर्मचाऱ्यांना पाठिंबा; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची काँग्रेसची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

IFB Workers Protest in Verna : तीन वर्षांच्या सेवेनंतर नियमितीकरणाची मागणी करणाऱ्या गोव्यातील 130 तरुणांकडे असंवेदनशील भाजप सरकारने डोळेझाक केली आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या मध्यस्थीने सदर प्रश्न तातडीने सोडवीण्याचा प्रयत्न करणार आहे. आयएफबी व्यवस्थापनाशी देखील एक सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी बोलणी करण्याची माझी तयारी आहे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

वेर्णा औद्योगिक वसाहत येथे आज गुरुवारी आयएफबीच्या संपावर असलेल्या कामगारांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा, एव्हरसन वालीस, कॅप्टन विरियाटो फर्नांडिस, मोरेनो रेबेलो आदी उपस्थित होते. भाजप सरकारने काँग्रेसचा जाहीरनामा लागू करावा, ज्यामुळे गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही 500 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे जाहिरनाम्यात वचन दिले होते, असे आलेमाव म्हणाले.

2012 मध्ये बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिलेले भाजप सरकार तीन निवडणुकांनंतरही स्वत:चे निवडणूक आश्वासन पूर्ण करू शकले नाही, हे खेदजनक आहे. आज दहा वर्षांनंतर ते ना बेरोजगारी भत्ता देत आहेत ना नोकऱ्या देत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी भाजप सरकारला इशारा दिला की, गोव्यातील युवकांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱ्या देण्याची प्रथा सुरू झाल्यास राज्यात मोठी समस्या निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांनी त्वरित हा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्ष नेहमीच गोमंतकीयांच्या हितासाठी लढला आहे. आम्ही युवकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या हक्कासाठी लढा देऊ, असे कॅप्टन विरियाातो फर्नांडिस यांनी सांगितले. काँग्रेस नेते मोरेनो रेबेलो यांनीही संपावर असलेल्या तरुणांना पाठिंबा देण्याचे वचन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT