Water bottles 
गोवा

गोव्यात कॉंग्रेसतर्फे उद्यापासून कोविड रूग्णांना पाणीपुरवठा

दैनिक गोमंतक

पणजी : गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसतर्फे 21 मे पासून  सरकारी रुग्णालयात (Government Hospital) उपचार घेत असलेल्या कोविड रूग्णांना (covid patient) व त्यांच्या बरोबर असलेल्या नातेवाईकांना पाण्याच्या बाटल्या (Water bottles) देण्यात येणार आहेत. पाणी देण्याच्या या उपक्रमात सुमारे 190 हजार  पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. (Congress to supply water to patients in Goa from tomorrow)

समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर म्हणाले, 21 मे रोजी ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी पाळणार आणि नंतर म्हापसा येथील आझिलो, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात, मडगाव येथील दक्षिण जिल्हा रुग्णालय, फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालयाला भेट देतील व तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना पाणी देणार आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा युवक कॉंग्रेस समितीचे सदस्य  दक्षिण गोव्यामध्ये वाटप करतील, तर उत्तर गोवा जिल्हा युवक कॉंग्रेस उत्तरेतील दोन सरकारी रुग्णालयात वाटप करेल. मागील 15 ते 20 दिवसांपासून आम्ही रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर आवश्यक वस्तू देण्यासाठी नियमितपणे या रुग्णालयांना भेट देत आहोत असे सांगून ते म्हणाले, रूग्ण आणि नातेवाईक पिण्यासाठी पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करत आहेत. यासाठी आम्ही हा उपक्रम  राबवण्याचे ठरविले आहे.


 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ Test Series: न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाचा चिंता वाढवणारा कसोटी रेकॉर्ड, 58 वर्षांत केवळ 2 मालिका विजय; गिल सेनेपुढे इतिहास बदलण्याचे मोठे आव्हान

कुलगाममधील CRPF पथकावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी चकमकीत ढेर

Rajat Patidar Century: 13 षटकार, 8 चौकार, 281 चा स्ट्राईक रेट! तडाखेबंद शतक ठोकून रजत पाटीदारने रचला नवा इतिहास; गोलंदाजांची उडवली झोप

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

SCROLL FOR NEXT