Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa IIT: CM सावंत यांच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा पलटवार

एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगे आयआयटीला विरोध करणाऱ्यांचाही पुरता समाचार घेतला.

दैनिक गोमन्तक

पणजी: सांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी 6 महिन्यात करणार असल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. यावर कॉंग्रेसने प्रतिक्रीया दिली असुन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, गोव्यात आयआयटीचे स्वागत. पण, लोकांच्या शेतजमिनी हिसकावून घेऊन त्यावर प्रकल्प नको. त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला, ज्या जागा प्रकल्पांसाठी अगोदर संपादित केलेल्या आहेत तेथे प्रकल्प का उभारला जात नाही?

एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगे आयआयटीला विरोध करणाऱ्यांचाही पुरता समाचार घेतला. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विविध व्यवसायांना चालना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गोव्यात येणाऱ्या इतर प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी येत्या सहा महिन्याच्या आत आयआयटीचीही पायाभरणी केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावित आयआयटी तसेच गोव्यात येणाऱ्या इतर प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात लोकांना सरकारी जमीन हडपण्याची सवय

गोव्यात लोकांना सरकारी जमीन हडपण्याची सवय लागली आहे. जर एखाद्याने सरकारी जागेवर घर बांधलं असेल आणि बरीच वर्ष राहात असेल तर सरकार म्हणून आम्ही त्याला ती जागा देण्यास तयार आहोत. एखाद्याचं घर मुद्दामहून मोडून त्याजागी प्रकल्प आणणार नाही. उलट त्याला सरकार जेवढ्यास तेवढी जमीन देण्यासही तयार आहे.

मात्र परिसरात चुकीचा संदेश पसरवत तेढ निर्माण करणं चुकीचं आहे. जर या जागेत एखादं कोपेल असेल तर तेही ख्रिस्ती बांधवांना सन्मानपूर्वक दिलं जाईल. या प्रकल्पाचं राजकारण होऊ नये यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा आणि आयआयटीचा मार्ग मोकळा करावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT